सांगली
सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरु आहे. मात्र जिल्ह्याचा पूर्व भागात अद्याप कोरडाच आहे. जत तालुक्यात दुष्काळ करण्याची मागणी जोर वाढू लागली आहे.
सांगली जिल्ह्यात अद्यापही पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे काही सखल भागात रस्त्यांच्या बाजूला पावसाचे पाणी साचले आहे. तसंच राज्यात येत्या चार दिवसांत हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
कोयना धरणातून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग
कोयना, वारणा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सध्या तरी कोयना धरणातून कृष्णा विसर्ग सुरु नसल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी 7 फुटांच्या आसपास स्थिर आहे. मात्र जर कोयना धरणात मुसळधार पाऊस वाढला आणि कोयनेतून विसर्ग सुरु केला तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात होणार आहे.
Published on: 19 July 2023, 02:55 IST