गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या तणावातून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले आहे. युद्ध जरी रशिया आणि युक्रेन मध्ये झाले असले तरी याचा सर्वात जबदस्त तोटा हा सामान्य जनतेला बसलेला आहे. या युद्धामुळे जगभरातील महागाई वाढल्याने सामान्य माणसाची परिस्थिती बिकट झालेली आहे.या दोन्ही देशांच्या युद्धामुळे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रावर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला आहे यामध्ये महागाई मध्ये वाढ, कृषी क्षेत्र, आयात निर्यात, कच्चे तेल आणि खाद्य तेल यांवर सर्वात जास्त परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. रशिया युक्रेन युद्ध चालू असल्याने कृषी क्षेत्रावर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
खतांच्या किमतीमध्ये भरघोस वाढ:-
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशामधील युद्धामुळे खतांच्या किमती मध्ये मोठी वाढ झालेली दिसून येते. कारण भारताच्या संपूर्ण खत आयतींपैकी 12 ते 15 टक्के खते ही रशिया आणि युक्रेन देशांमधून येतात. तसेच खतनिर्मिती साठी सर्वात महत्वाचे पोटॅश असते परंतु रशिया पोटॅश चा पुरवठा हा भारतात करत असतो परंतु युद्धामुळे अनेक अडथळे निर्माण झाल्यामुळे खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे खतांच्या किमती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते.
गव्हाच्या भावात प्रचंड वाढ:-
रशिया आणि युक्रेन च्या युद्धामुळे गव्हाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे कारण जगात सर्वात जास्त गव्हाचे उत्पन्न हा रशिया देश घेत असतो आणि युक्रेन हा जगात तिसऱ्या क्रमांकावर येत असल्यामुळे या दोन्ही देशात गव्हाचे प्रचंड उत्पन्न निघते. परंतु युद्धामुळे या देशातून गव्हाची निर्यात थांबली आहे त्यामुळे भाव वाढले आहेत. या मुळे आता भारतातून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात होत आहे.
खाद्य तेलाच्या किमतीमध्ये वाढ:-
रशिया आणि युक्रेन यामधील युद्धामुळे जगभरातील खाद्य तेलाच्या किमती वाढल्या आहेत. युद्धाचा परिणाम हा संपूर्ण जगावर झाला आहे त्यामुळे महागाई मध्ये वाढ झालेली आहे तेलाच्या किमती वाढल्यामुळे सूर्यफूल सोयाबीन च्या दरात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
महागाई चे संकट:-
युद्धाच्या काळात जगभरात महागाई वाढली आहे यामुळे सर्व सामान्य जनता चांगलीच अडचणीत सापडली आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेती करणे अवघड झाले आहे बियाणांची वाढती किंमत, खतांचा तुटवडा आणि इंधनाचे वाढते भाव यामुळे शेती करणे अवघड झाले आहे यामुळे कृषी क्षेत्रावर हे खूप मोठे संकट ओढवले आहे.
Published on: 10 March 2022, 05:34 IST