या कार्यक्रमा निमित्ताने स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी राज्यमंत्री ना सत्तारांकडे सोमठाणा येथील वाढिव पुलाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबीत असल्याने त्या पुलाच्या प्रस्तावास मंजुरात देण्यात यावी,उर्वरीत रस्ता डांबरीकरण काम तातडीने करण्यात यावे,यासह तालुक्यातील रस्ते व शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सविस्तर चर्चा करीत देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील सोमठाणा येथील रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत करण्यात आले आहे.ते आजही अपुर्ण अवस्थेत आहे.
तर याच रस्त्यावर छोटा पुल मंजुर करण्यात आला होता.परंतु मुसळधार पाऊस होवुन पुर आल्यास गावचा संपर्क तुटत असल्याने सदरचा पुल मोठ्या स्वरुपात व्हावा,म्हणजेच पुलाची उंची वाढवण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी जिल्हाधिकारी,
संबंधीत विभागाचे कार्यकारी अभियंता, यांच्याकडे जानेवारी महिण्यामध्ये करण्यात आली होती.त्यावेळी आंदोलनाचा इशारा सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला होता.दरम्याण या अनुषंघाने योग्य ती कार्यवाही करण्याचे अश्वासन संबंधीत विभागाकडुन देण्यात आले होते.या अनुषंघाने लोकप्रतिनिधी यांनी अनेक वेळा पाठपुरावा देखील केला आहे.परंतु महिणे उलटुन सुध्दा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.यापुर्वी या पुलावरुण पुर असल्याने गावातील जनतेस समस्या निर्माण होवुन असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले होते.
असे असतांना वारंवार मागणी करुनही संबंधीत ग्रामविकास विभागाकडुन योग्य ती कार्यवाही होतांना दिसत नसल्याने सद्यास्थीतीत मौजे सोमठाणा येथील वाढिव पुलाचा प्रस्ताव उपसचिव मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामविकास विभाग,कार्यालय यांच्याकडे प्रलंबीत असुन सदरील मागणीच्या अनुषंघाने संबंधीत विभागास आदेशीत करण्यात यावे,त्याचप्रमाणे वाढिव प्रस्तावास मंजुरात देण्यात यावी व ग्रामस्थांचा रखडलेला प्रश्न निकाली काढावा,पळसखेड जयंती रस्त्याची खस्ता हालत पाहता उर्वरीत रस्ता डांबरीकरण काम करण्यात यावे,त्याचप्रमाणे इ पिक पेरा संदर्भात शेतकर्याना असंख्य अडचणी निर्माण होत असल्याने एॅप मधे सुधारणा व्हावी व त्या समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री ना अब्दुल सत्तार हे खंडाळा मकरध्वज येथे नागरी सत्कारा निमित्ताने आले असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करुण निवेदनाव्दारे केली आहे.
याबाबत मागण्यांच्या अनुषंघाने संबंधीत ग्रामविकास विभागाकडील प्रस्ताव मागवुन न्याय देण्याचे अश्वासन देण्यात आले आहे.यावेळी स्वाभिमानी चे रविराज टाले,अमोल पवार,जगाराव ठेंग,प्रकाश ठेंग,पुरुषोत्तम जाधव,रमेश ठेंग,रामेश्वर पवार,ज्ञानेश्वर ठेंग,रामेश्वर चेके,गोपाल मोरे,सचिन खरात,यांच्यासह ग्रामस्थ व स्वाभिमानी चे कार्यकर्ते उपस्थीत होते.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 15 September 2021, 07:06 IST