मागील अनेक दिवसांपासून पंतप्रधान किसान योजनेचा १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार याची चर्चा चालू होती पण आता ही तारीख निश्चित झालेली आहे. ही रक्कम पुढच्या वर्षी जमा होईल त्यामुळे लाभार्थी वर्गाला याची वाट पहावी लागणार आहे. १ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी वर्गाशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत त्यामुळे १ जानेवारी रोजी च १० वा हप्ता जमा होईल असे सांगण्यात आले आहे. नववर्ष सुरू होताच शेतकऱ्यांना केंद्र सरकरद्वारे गिफ्ट भेटणार आहे असे सांगितले जात आहे.
नववर्षाचे शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट...
२५ डिसेंम्बर पर्यंत पंतप्रधान किसान योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे का याची वर्गवारी केली जाणार आहे मात्र १ जानेवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शेतकऱ्याना नवीन वर्षाचे गिफ्ट देण्याच्या तयारीत केंद्र सरकार जुटले आहे. मागील वर्षी १५ डिसेंम्बर ला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता.
देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मिळतोय योजनेचा लाभ...
शेतकऱ्यांना वर्षाला पीएम किसान योजना अंतर्गत ६ हजार रुपये खात्यावर जमा होतात. शेतकऱ्यांना केंद्र सरकारने आता पर्यंत ११.१७ कोटी रुपये पेक्षा अधिक मदत केली आहे. हे ६ हजार ३ टप्यात शेतकऱ्यांना दिले जातात. यामध्ये पहिला टप्पा १ डिसेंम्बर ते ३१ मार्च, दुसरा टप्पा १ एप्रिल ते ३१ जुलै आणि तिसरा टप्पा १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर. मात्र यावेळी चा डिसेंम्बर महिन्यातील हप्ता शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात भेटणार आहे.
या पद्धतीने करा चेक तुमचे नाव...
पीएम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीनेअर्ज करावे लागणार आहेत त्यासाठी त्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. सर्वात प्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन होम पेज वर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरात फार्मर्स कॉर्नर असे लिहले आहे. नंतर आपले नाव यादीत आहे का नाही आणि जर असल्यास लाभार्थी यादीवर क्लिक करावे. त्यानंतर तुम्ही तुमचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका तसेच गट आणि गाव ही माहिती भरून तपासा.
कृषी मंत्रालयाचे शेतकऱ्यांना आवाहन...
१ जानेवारी ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जो शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला pmindiawebcast.nic.in या लिंक वर क्लिक करावे लागणार आहे.
Published on: 24 December 2021, 09:38 IST