News

कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरपीला खारघरमधील टाटा रुग्णालय येथे सुरुवात होणार आहे. या प्रोटॉन थेरपीच्या उपचार कक्षाची प्रोटोकॉल चाचणी यशस्वी झाली. या मशिनची किंमत सुमारे ५५० कोटी एवढी आहे.

Updated on 11 February, 2022 4:25 PM IST

कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरपीला खारघरमधील टाटा रुग्णालय येथे सुरुवात होणार आहे. या प्रोटॉन थेरपीच्या उपचार कक्षाची प्रोटोकॉल चाचणी यशस्वी झाली. या मशिनची किंमत सुमारे ५५० कोटी एवढी आहे. अमेरिकेसारख्या इतर देशात प्रोटॉन थेरपीच्या उपचाराचा खर्च सुमारे १ ते २ कोटी एवढा आहे. 

मात्र या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. प्रोटॉन थेरपी देशातील सार्वजनिक भागीद्वारे सुरू करण्यात आलेली ही पहिलीच अद्ययावत उपचार पद्धती आहे. जगातील केवळ १२० देशांमध्ये ही कर्करोगासाठी आधारित अद्ययावत उपचार पद्धती उपलब्ध आहे. सर्वसामान्य रुग्णांना विशेषतः लहान मुलांना या आधुनिक व प्रभावी उपचार पद्धतीचा लाभ होईल, असे आयबीएचे राकेश पाठक यांनी सांगितले. लवकरच संबंधित कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याने रुग्णांना या अद्ययावत उपचार पद्धतीचा लाभ होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. कॅन्सरवर वैद्यकीय उपचार करताना शरीरातील कर्ककारक नसलेल्या इतर पेशींना न मारता कॅन्सरसाठी कारणीभूत असलेल्या पेशींवर घाव घालण्यासाठी प्रोटॉन थेरपी उपयोगी ठरणार आहे.

टाटा रुग्णालयाने सुरू माध्यमातून या मशीनची निर्मिती केलेल्या खारघर येथील केंद्रामध्ये हेड्रॉन बीम थेरपी (प्रोटॉन) यंत्र आणण्यात आले आहे. हे यंत्र केवळ शरीरामध्ये असलेल्या कॅन्सरच्या पेशींचा नाश करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची बेल्जियममधील आयबीए कंपनीच्या करण्यात आली. आयबीएचे भारतातील संचालक राकेश पाठक यांच्या टीमच्या माध्यमातून प्रोटॉन थेरपीची यंत्रणा बसविण्याचे काम मागील काही काळापासून खारघर टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये सुरू आहे

English Summary: The country's first proton theory treatment system on cancer at Kharghar Tata Hospital, Navi Mumbai
Published on: 11 February 2022, 04:24 IST