पुणे : देशातील दुधाचे उत्पादन उत्पादन २०२४ पर्यंत ३३ कोटी टन होईल अशी अपेक्षा केंद्रीय पशुसंवर्धनमिरी गिरीराज सिंह यांनी नुकत्याच दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
आजमितीला देशातील दुधाचे उत्पादन १८.८ कोटी टन आहे. पशुसंवर्धनमंत्री म्हणाले कि, देशातील फक्त २० ते २५ टक्के दूध मुख्य प्रवाहात म्हणजेच प्रकियेच्या माध्यमातून येते. २०२४ पर्यंत देशातील दुधाचे उत्पादन ३३ कोटी टनापर्यंत पोहोचेल.
भारतात दुग्ध व्ययसाय हा शेतीतील सर्वात मोठा पूरक व्यवसाय आहे. भारतात सहकारी,खाजगी संस्थांच्या माध्यमातून दूध मुख्य प्रक्रियेमध्ये येते. भारतात जास्तीत दूध संघटित क्षेत्रामध्ये येण्याची गरज आहे. भारत सरकारने नुकताच दुग्ध प्रकिया पायाभूत सुविधा विकास निधीची स्थापना केली आहे. याच्या माध्यमातून देशातील सुह्द उतपादन वाढीस लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
Published on: 25 July 2020, 07:32 IST