News

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम ३ (३) नुसार गाळप झालेल्या उसाची किंमत १४ दिवसात त्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असलेली अट शिथिल करून कारखान्यांनी शेतकऱ्यांशी करार करून उसाची वाजवी व किफायतशीर किंमत (एफआरपी) दोन-तीन टप्प्यात द्यावी, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या नीती आयोगाने तशी शिफारस केली असून,

Updated on 24 April, 2021 10:49 PM IST

केंद्र शासनाच्या ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम ३ (३) नुसार गाळप झालेल्या उसाची किंमत १४ दिवसात त्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असलेली अट शिथिल करून कारखान्यांनी शेतकऱ्यांशी करार करून उसाची वाजवी व किफायतशीर किंमत (एफआरपी) दोन-तीन टप्प्यात द्यावी, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

शासनाच्या नीती आयोगाने तशी शिफारस केली असून, त्यानुसार राज्य शासनाने साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गटाची नियुक्ती गुरुवारी केली आहे. मात्र यामुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा पेटणार आहे.साखरेच्या दरावर नियंत्रण नसल्याने त्यातील चढ-उतारामुळे कारखान्यांना एकरकमी एफआरपी देताना दमछाक होते, परंतु केंद्र सरकारने साखरेचा दर निश्चित न करता शेतकऱ्यांना बिले देण्याची पद्धतच कायद्याने बदलण्याचा विचार सुरू केला असल्याचे दिसत आहे. ही मूळ मागणी देशभरातील सहकारी व खासगी साखर उद्योगाने केंद्र शासनाकडे केली होती. त्यानुसार नीती आयोगानेही तशी शिफारस करून त्याची कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत.

ऊस नियंत्रण आदेशानुसार आता गाळप झालेल्या उसाचे बिल १४ दिवसांत देणे बंधनकारक आहे. ते देता येत नसेल तर कारखाने हे बिल कसे देणार, याचा शेतकऱ्यांशी करारनामा करून कार्यपद्धती निश्चित करू शकतात. अलीकडील काही वर्षांत कारखाने वार्षिक सभेत दोन-तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचा ठराव मंजूर करून घेतात; परंतु तो साखर आयुक्तांना मान्य नाही.

कारखान्यांना प्रत्येक शेतकऱ्याशी स्वतंत्र विहीत नमुन्यात करार करून एफआरपी देता येते. त्यानुसार साखर संघाने राज्यभरातील कारखान्यांना असा मसुदा पाठवला आहे. त्यानुसार कारखाने २, ३ किंवा ४ टप्प्यातही शक्य लेखक -मनोहर पाटील

प्रतिनिधी - गोपाल उगले
मो -9503537577

English Summary: The condition of giving one lump sum FRP will be abolished; The issue of sugarcane will flare up again
Published on: 24 April 2021, 10:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)