केंद्र सरकारने या वर्षीच्या हंगामासाठी बीजी -१ आणि बीजी२ कपाशी बियाणे दरात पाच टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीजी -१ बीटी पाकीट ६३५ रुपयांना मिळेल.
तर बीजी -२ पाकिटांची किंमत ७६७ रुपये करण्यात आली असून याविषयीचे राजपत्र बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. बियाणे कंपन्यांकडून बीटी बियाणे दरात वाढीची मागमी होती. नॅशनल सीड असोसिएशनने केंद्र सरकार स्तरावर त्यासाठी पाठपुरावा केला होता. सध्या बीजी -१ तंत्रज्ञान रॉयल्टीविना उपलब्ध करुन दिले जात आहे. बीजी-२ वरील रॉयल्टीची आकारणी मात्र कायम आहे. गेल्या वर्षी हंगामात बीजी -१ कपाशी बियाण्याचे पाकीट ६३० रुपयांना, तर बीजी -२ चे पाकीट ७३० रुपयांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यावर्षी मात्र बीटी बियाणे पाकीट दरात सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. बीजी-१ बीटी पाकीट ६३५ रुपयांना तर बीजी -२ पाकिटांची किंमत ७६७ रुपये करण्यात आली आहे. बियाणे उद्योगाकडून या दरवाढीचे स्वागत करण्यात आले असून या माध्यमातून संशोधन आणि विकास कार्यासाठी पैसा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र ही दरवाढ पुरेशी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे, सरासरी दहा टक्के दरवाढ हवी,अशी बियाणे उद्योगाची मागणी आहे.
बियाणे दरात कपात करण्यात आल्याने कंपन्यांचे संशोधन आणि विकासकार्य प्रभावी झाले होते. नवे वाण संशोधनकार्यासाठी देखील पैशाची उपलब्धता करण्याचे आव्हान होते, त्यामुळे केंद्र सरकारकडे नॅशनल सीड असोसिएशनने सरकारी दहा टक्के दरवाढीची मागणी केली होती. केंद्र सरकारने या मागणीची दखल घेत या वर्षी पाच टक्के दरवाढ केली आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया नॅशनल सीड असोसिएशन दिल्लीचे मुख्य प्रवर्तक, आर. के. त्रिवेदी यांनी दिली आहे.
Published on: 01 April 2021, 03:27 IST