सध्या राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाले आहे. असं असलं तरी बऱ्याच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मध्यंतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडाळाचा विस्तार केला जाईल असे सांगितले होते. यामध्ये शिंदे गटाला महत्वाची भूमिका दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि राज्यात नवे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चांना उधाण आले आहे. १९ किंवा २० जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये १५ मंत्रिपदं हे शिंदे गटाला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जेव्हापासून शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झाले आहे तेव्हापासूनच मंत्रिमंडळात कोण आघाडीवर असणार? याबाबत चर्चा रंगल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार १९ तारखेला लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार पार पडण्याची शक्यता आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी ५ मंत्री शपथ घेऊ शकतात.
शिंदे गटानं केली २० मंत्रिपदांची मागणी
१९ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. २० मंत्रिपदांची शिंदे गटानं मागणी केली असून त्यांना १५ मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र सुरुवातीला शिंदे -फडणवीस या दोन्ही बाजूंचे प्रत्येकी ५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेल्याने महाराष्ट्र वाऱ्यावर आहे अशा शब्दात संजय राऊतांनी शिंदे सरकारवर वार केला होता. तसेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही शिंदे सरकारवर निशाणा साधत मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गट फुटणार असल्याचे वक्तव केले होते.
मुख्यमंत्री कार्यालय बंद
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन बारा दिवस उलटून गेले. मात्र अजूनही मुख्यमंत्री कार्यालय सुरू झालेले नाही. गेले १२ दिवस मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारीच उपस्थित नाहीत. शिवाय मंत्रिमंडाच्या विस्तारानंतर मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नेमणूक प्रक्रियाही सुरु होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Cabinet Decision: शेतकरी ते पेट्रोल; वाचा शिंदे सरकारचे धडाकेबाज नऊ मोठे निर्णय
धक्कादायक! ६ हजार कोटी रुपयांच्या सबसिडीचा गैरवापर; खतांचा काळा बाजार उघडीस
Published on: 14 July 2022, 03:36 IST