News

जालन्यात मराठा समाजावर लाठीचार करण्यात आल्यानंतर राज्यात मोठे आंदोलन पेटले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्राणपणाला लावले आहेत. जरांगे पाटील गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.

Updated on 06 September, 2023 11:03 AM IST

जालन्यात मराठा समाजावर लाठीचार करण्यात आल्यानंतर राज्यात मोठे आंदोलन पेटले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्राणपणाला लावले आहेत. जरांगे पाटील गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.

आज नवव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, तरीही ते आपल्या निर्धारावर ठाम आहेत. यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडायचे नाही असा निर्धारच त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे राज्याचे लक्ष याकडे लागले असून मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यांच्या अंगात ताकद राहिली नाही. त्यांना अस्वस्थ वाटू लागले आहे. त्यामुळे उपोषण स्थळीच जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली आहे. पहाटेच त्यांना सलाईन लावली आहे. त्यांच्याभोवती कार्यकर्ते जमले आहेत.

जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची बातमी पसरल्याने जालना, औरंगाबादसह आजपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे यायला निघाले आहेत. अनेकजण याबाबत चौकशी करत आहेत.

त्यामुळे आज अंतरवाली सराटी येथे आंदोलकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जालना येथील झालेल्या लाठी हल्ल्यानंतर सरकार विरोधात मराठा समाजाची संतापाची भावना वाढली आहे. राज्यात देखील आंदोलने सुरू आहेत.

मराठा आरक्षणावरून आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. चार वर्षांपासून थंडावलेले आंदोलन पुन्हा चिघळले आहे. यामुळे आता तरी निर्णय होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मान्सून पुन्हा एकदा होणार सक्रिय, 'या' दिवशी राज्यात धो- धो बरसणार

English Summary: The biggest news in the state! Manoj Jarange's condition deteriorated, saline was applied, anxiety increased....
Published on: 06 September 2023, 11:03 IST