News

राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

Updated on 02 July, 2023 1:56 PM IST
AddThis Website Tools

राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार हे विधानभवनावर दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आपली वेगळी भूमिका मांडली होती.

English Summary: The biggest news! Ajit Pawar likely to take oath as Deputy Chief Minister
Published on: 02 July 2023, 01:56 IST