News

सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवड सुरू झाली आहे परंतु याला लागवड म्हणायचे की पेरणी हा प्रश्न पडलेला आहे. यापूर्वी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली होती पण आता बदलत्या काळाप्रमाणे शेतकऱ्यांचा कल पेरणीकडे ओळला आहे. कांदा हे नगदी पीक आहे पण याला दर कसा भेटेल हे सांगू शकत नाही त्यामुळे यावेळी पेरणी का लागवड असा प्रश्न समोर आलेला आहे.

Updated on 16 November, 2021 5:29 PM IST

सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवड सुरू झाली आहे परंतु याला लागवड म्हणायचे की पेरणी हा प्रश्न पडलेला आहे. यापूर्वी कांद्याची  लागवड  मोठ्या  प्रमाणात  झालेली  होती  पण  आता बदलत्या काळाप्रमाणे शेतकऱ्यांचा कल पेरणीकडे ओळला आहे. कांदा हे नगदी पीक आहे पण याला दर कसा भेटेल हे सांगू शकत नाही त्यामुळे यावेळी पेरणी का लागवड असा प्रश्न समोर आलेला आहे.

कांदा लागवडीची प्रक्रिया:-

मागील काही दिवसांपासून कांदा लागवड महत्व व पेरणीचे चे महत्व याबद्धल सोशल मीडियावर सांगितले जात आहे.यावेळी जोरदार पाऊस पडल्याने खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच शेतीसाठी लागणारे जे साहित्य आहे त्याच्या सुद्धा किमती वाढलेल्या आहेत. यावेळी कांदा  लागवड  करणे महत्वाचा  की पेरणी करणे महत्वाचे असा मुद्धा समोर आलेला आहे.कांदा लागवड करण्याआधी तुम्हाला सुरुवातीला शेतजमिनीची मशागत करावी लागेल त्यानंतर रोपांची  लागवड  करणे.  लागवड  केल्यापासून  दीड महिन्यात हे रोप लागवडी योग्य होते त्यानंतर याची लागवड करायची. ही प्रक्रिया अवघड असल्याने शेतकऱ्यांचा पैसा आणि  वेळ  खूप खर्च होतो. रोप  लावडीपासून  चार  महिन्याने   कांदा काढण्यास येतो. या दरम्यान रोपांवर किडीचा प्रादुर्भाव तसेच धुईचा धोका कायम असतो.

कांदा पेरणी हाच पर्याय:-

मशागत केलेल्या शेतजमिनिवर कांदा पेरणी केली जाते. आताच्या काळात शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करण्याकडे ओळलेला आहे. वातावरण पाहता वेळेवर पेरणी करावी लागते तसेच जो पेरलेला कांदा आहे तो ४-५ महिन्यात काढणी योग्य होतो.

पेरणी यंत्रही उपयोगाचे:-

शेती व्यवसाय हा यंत्रावर अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येक हंगामात एक यंत्र शेतामध्ये दिसतेच. कांद्याची पेरणी ही ट्रॅक्टर च्या सहाय्याने तर केली जातेय मात्र आता कृषी विद्यापीठाणे सुद्धा यंत्र तयार केले आहे त्यामुळे मजुरांचा खर्च तर वाचतोच तसेच बियनांची बचतही होते.

English Summary: The big question facing farmers is whether onion cultivation or sowing
Published on: 16 November 2021, 05:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)