1. बातम्या

स्टेट बँकेच्या ग्राहकांना बँकेने दिला इशारा, बँकेच्या नावे होतेय फसवणूक

कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन केले जात होते. ऑनलाईन शॉपिग अधिक व्हावी यासाठी कंपन्या विविध ऑफर्स देत असतात. ग्राहकही ऑफर्स पाहून ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात करत असतात. पण याचाच फायदा सायबर गुन्हे करणारे लोक घेत असतात.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया

कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन केले जात होते. ऑनलाईन शॉपिग अधिक व्हावी यासाठी कंपन्या विविध ऑफर्स  देत असतात. ग्राहकही ऑफर्स पाहून ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात करत असतात. पण याचाच फायदा सायबर गुन्हे करणारे लोक घेत असतात.

त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक होणं आवश्यक आहे. बँकेचे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने अगदी कमी वेळात सहज आणि वेगाने होतात. त्यामुळेच ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याकडे हल्ली अनेकांचा अधिक कल असतो. इंटरनेट आणि स्मार्टफोन्समुळे बँकिंग खूपच सोपे केले आहे. मात्र अशात ऑनलाईन फ्रॉड वाढले आहेत. अशा फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

 स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावध करत असते. यावेळी ही बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ग्राहकांना अलर्ट केले आहे.त्यांनतर आता स्टेट बँकेने सर्व ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

सध्या अनेक लोक एसबीआयच्या नावाने ग्राहकांना फोन करून वैयक्तिक माहिती विचारत आहेत. त्यामुळे तुम्हालाही असा कोणता फोन आला तर सावध राहा आणि तपासणी केल्याशिवाय आपली खासगी माहिती शेअर करू नका असं बँकेकडून सांगण्यात आले आहे. नाहीतर तुम्हाला याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

काही सायबर हॅकर्स बँक अधिकारी केवायसी व्हेरिफाय करण्याच्या नावाखाली लोकांना कॉल करत आहेत. आपण त्यांना माहिती देताच खात्यातून पैसे काढले जात आहेत. अशा कॉल किंवा मेसेजपासून सावध रहा, असे बँकेने स्पष्ट ट्वीट करून केले आहे. अशा असंख्य तक्रारीही बँकेकडे आल्या आहेत. त्यानंतर ही बाब बँकेपर्यंत पोहोचली की हा कोणी बँकेचा माणून नसून फसवणूक करणारा आहे.

 

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारा कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं भासवून तुमची वैयक्तिक माहिती गोळा करेन आणि तुमच्या खात्यामधून सगळे पैसे काढून घेईन. असं काहीही तुमच्यासोबत घडलं तर तात्काळ cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा.

English Summary: The big news - SBI warns its customers that fraud is taking place in the name of the bank Published on: 16 January 2021, 06:14 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters