आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात अजूनही मोठ्या प्रमाणात कॅशचा वापर करत असतो. डिजिटल पेमेंट (Digital payment) अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी देखील अजूनही अनेक ठिकाणी डिजिटल ऐवजी रोकड व्यवहार होत आहे. यासाठी आपण नेहमीच एटीएम (ATM) मध्ये कॅश काढण्यासाठी जात असतो. आपण एटीएम कार्डचा (ATM Card) वापर करून सामान्यपणे एटीएम मधून पैसे काढत असतो.
मात्र जर आम्ही आपणास सांगितले की, एटीएम कार्ड (Debit Card) ऐवजी देखील एटीएम मधून पैसे निघू शकतील तर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. परंतु आगामी काही दिवसात एटीएम मधून एटीएम कार्ड विना पैसे काढणे शक्य (Withdraw money from ATM without ATM card) होणार आहे.
यासंदर्भात आरबीआयचे गव्हर्नर (Governor of RBI) माननीय शक्तीकांत दास यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरून सर्व बँकामधून तसेच एटीएममधून कार्डलेस अर्थात एटीएम कार्ड न वापरता रोख पैसे काढण्याची सुविधा देण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ज्यासाठी एनपीसीआय, एटीएम नेटवर्क आणि बँकांना लवकरच स्वतंत्र सूचना जारी केल्या जाऊ शकतात.
हेही वाचा:-पंतप्रधान आधार कार्ड कर्ज योजना अर्ज करुन मिळवा व्यवसायासाठी पैसा, करा ऑनलाईन अर्ज
गैरव्यवहार थांबण्यास मदत होणार:- मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एटीएम कार्डमधून पैसे काढताना अनेकदा लोकांची फसवणूक होतं असते. याआधी आपल्या संपूर्ण देशात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ही लोकांची होणारी सर्व फसवणूक थांबवण्यासाठी कार्डलेस अर्थात एटिएम न वापरता कॅश काढण्याची सुविधा संपूर्ण देशात आरबीआय कडून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे लोकांची होणारी फसवणूक टाळता येणे शक्य होणार आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) म्हणतात की, रोकडं कॅश काढण्यासाठी ही एक चांगली व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे ही व्यवस्था सुरवातीला देशातील काही मोजक्याच बँकांना दिली जाणार आहे. ज्यासाठी RBI नियंत्रित बँकामधील ग्राहक सेवा मानकांचे पुनरावलोकन केले जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. त्यानंतरच या सुविधेबाबत सर्व तांत्रिक बाबी विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे गव्हर्नर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा:-फिर हेरा फेरी नाही, ही तर आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, पैसे होत आहेत दुप्पट
Published on: 08 April 2022, 10:41 IST