परभणी: पिएम किसान योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी eKYC केली तरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याने पिएम किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी दि.5 सप्टेबंर पर्यंत विनाविलंब eKYC करून घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे मा.जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.भारत सरकारची महत्वपूर्ण योजना असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजने
अंतर्गत शेतक-यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते.Farmers are given financial assistance by the government. शासनाच्या या योजनेत तीन टप्प्यात 2000 रुपये प्रमाणे शेतक-यांच्या बॅक खात्यावर वार्षीक 6000 रूपये जमा केले जातात. पात्र शेतक-यांना आतापर्यंत 11 टप्प्यात 22 हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 12 व्या टप्प्याचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. त्याकरीता प्रत्येक
पात्र लाभार्थी शेतकऱ्याने eKYC करणे अनिवार्य आहे. या योजनेत पात्र असलेल्या सर्व शेतक-यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केद्रास भेट देउन किंवा घरबसल्या https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळास भेट देउन दि. 5 सप्टेबंर पर्यंत eKYC करावी. eKYC करण्यासाठीची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे.ई-केवायसी करण्याची पध्दती अगदी सोपी आहे-1.शेतकरी आपल्या नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर भेट देउन ई-केवायसी करू शकतात.o शेतक-यांनी आपले आधार कार्ड सोबत घेउन बोटांच्या ठसाव्दारे
ई-केवायसी करावी.o आधार कार्डशी सलग्न मोबाईल ओटीपीव्दारे ई-केवायसी करावी.2. शेतकरी पीएम किसानच्या www.pmkisan.gov.in वेबसाईटवर भेट देउनही ई-केवायसी करू शकतात.o E-KYC पर्याय निवडाo आधार नंबर नमुद कराo नोंदणीकृत (आधारशी लिंक असलेला) मोबाईल नंबर नमुद कराo Get Mobile OTP या पर्यायाचा वापर करून आलेला OTP नमुद करा.
Submit पर्यायाचा वापर करून E-KYC पूर्ण करा.जिल्ह्यात्तील एकुण 2,95,699 पैकी 2,03,291 लाभार्थ्यांनी eKYC केलेली आहे तरी उर्वरीत 96212 पात्र लाभार्थ्यांनी विनाविलंब eKYC करून घ्यावी याबाबतचे आवाहन मा. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.
Published on: 03 September 2022, 03:21 IST