News

मोदी सरकारकडुन आज अंतरीम अर्थसंकल्प सादर केला जात आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.यावेळी ते बोलतांना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतरिम अर्थसंकल्पाविषयी त्यांनी मत व्यक्त केले.नारीशक्तीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचेही ते म्हणाले.

Updated on 01 February, 2024 12:44 PM IST

मोदी सरकारकडुन आज अंतरीम अर्थसंकल्प सादर केला जात आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.यावेळी ते बोलतांना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतरिम अर्थसंकल्पाविषयी त्यांनी मत व्यक्त केले.नारीशक्तीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचेही ते म्हणाले.यावेळी बोलतांना मोदी म्हणाले.या नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी, या संसदेने एक अतिशय सन्मानजनक निर्णय घेतला होता.जो नारीशक्तीला सक्षम करणारा होता.नारीशक्तीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचेही ते म्हणाले.

संसदेत घातलेल्या गोंधळावर पश्चातापाची विरोधकांना संधी पंतप्रधान -नरेंद्र मोदी 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतांना म्हणालेत की ,मागील १० वर्षात संसदेत प्रत्येकाने आपल्याला मार्गाने आपले काम केले. ज्यांना गोंधळ घालण्याची सवय झाली आहे. लोकशाही मूल्यांना फाटा देत अशा सर्व खासदारांनी आत्मपरीक्षण करायला हवे.मागील १० वर्षात त्यांनी काय केले, हे त्यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील १०० लोकांना विचारावं, कोणालाच आठवणार नाही. कुणाला नावही माहीत नसेल. पण ज्यांनी सभागृहात चांगल्या विचारांनी संसदेचा फायदा करून दिला,अशा लोकांचा एक मोठा वर्ग आजही त्यांना स्मरणात ठेवेल आणि त्यांचे कौतुक करेल.आतापर्यंत संसदेत घातलेल्या गोंधळावर पश्चातापाची विरोधकांना संधी आहे,यावेळी बोलतांना असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नारीशक्तीच्या नव्या पर्वाची सुरुवात

मोदी म्हणालेत,२६ जानेवारी रोजी कर्तव्यपथावर नारी शक्तीचं सामार्थ स्थैर्य, संकल्पशक्ती देशाने पाहिली.तर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन आणि निर्मला सीतारामण यांचे अंतरिम अर्थसंकल्प हे एक प्रकारे,स्त्री शक्तीच्या साक्षात्काराचं पर्व होय.असेही मोदी म्हणालेत.नारीशक्तीच्या नव्या पर्वाची सुरुवात असेही ते बोलतांना म्हणालेत.

नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प घेऊन येऊ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलतांना म्हणाले की,लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना पूर्ण अर्थसंकल्प ठेवला जात नाही, आम्हीही तीच परंपरा पाळू आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प घेऊन येऊ.देश प्रगतीची नवीन शिखरे पार करत सतत पुढे जात असल्याचा मला विश्वास आहे.

English Summary: The beginning of a new era of women's power, after the formation of the new government, we will come with a complete budget-Narendra Modi
Published on: 01 February 2024, 11:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)