News

गव्यांच्या अंगावर शिंग लागल्याच्या खुणा आहेत. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहीत रानभरे यांनी मृत गव्याची तपासणी केली.

Updated on 13 May, 2022 5:19 PM IST

Bajarbhongaon : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव जवळील पोहाळे तर्फ बोरगाव या गावांच्या हद्दीत दोन गवा रेड्यांची झुंज जुंपली यात एका गवा रेड्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आज, शुक्रवारी सकाळी तानाजी सावू पाटील यांच्या शिव नावाच्या शेतात ही घटना घडली. या झुंजीमुळे शेतकऱ्याच्या ऊस पिकाचे अमाप नुकसान झाले आहे. तानाजी सावू पाटील यांचा सुमारे पाच गुंठ्यातील ऊस भुईसपाट झाला आहे.

आज, सकाळी शेतीच्या कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी लगेचच वनकर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वनपाल नाथा पाटील, वनरक्षक कुंडलीक कांबळे, महादेव कुंभार, संगिता देसाई, वनमजूर बाळू म्हामुलकर, नाथा पाटील, यशवंत पाटील, शंकर पाटील हे घटनास्थळी आले.

त्या घटनेची पाहणी केली असता त्यांच्या असे निदर्शनात आले की, गव्यांच्या अंगावर शिंग लागल्याच्या खुणा आहेत. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहीत रानभरे यांनी मृत गव्याची तपासणी केली. गेले काही दिवस जिल्ह्यात मानवी वस्तीमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. अन्नाच्या शोधात हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत.

दोन दिवसापुर्वीच पन्हाळ्याच्या दक्षिण बाजूकडील पायथ्याशी असलेल्या वाघवेजवळच्या डोंगरात तीस गव्यांचा कळप नागरिकांच्या निदर्शनास आला होता.
गव्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे भयानक नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तसेच वन्यप्राण्यांचा वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:
नांदेडच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग यशस्वी; पीक पद्धतीत केला 'हा' बदल
शेतकरी संतापला: थेट तलाठी कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप
मानला लेका; शेतकऱ्यांच्या मुलांचे नेत्यांचे मुखवटे घालून अनोखे आंदोलन

English Summary: The battle of the two gaur ; Farmer's cane flat
Published on: 13 May 2022, 05:19 IST