भारतातील सर्व राज्यात यावर्षी दमदार पाऊस झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात पिकांचे उत्पन्न तयार केले आहे. यावर्षी सर्वसाधारण पावसापेक्षा ६ % जास्त पाऊस बरसला. याचाच परिणाम लागवडीवर झालेला दिसून येत आहे. लागवडीखालील क्षेत्र गतवर्षीपेक्षा यंदा ८.५६ टक्क्यांनी जास्त आहे. तांदळाखालील क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत १२% वाढ झाली आहे, तर तेलबिया क्षेत्र १४% जास्त आहे.
सरकारकडे अन्नधान्याचे जास्त उत्पादन झाले आहे. परंतु आपल्याला डाळी आणि तेलबिया पिकविण्याची गरज आहे, डाळी आणि तेलबियांसाठी आपण आयातीवर अवलंबून आहोत. तेलबियांच्या क्षेत्रात अधिक क्षेत्र आणून आपण स्वावलंबी होऊ, असे कृषी आयुक्त एस. के. मल्होत्रा म्हणाले. तांदूळ, कापूस पिकेही यावेळी चांगली दिसत आहेत. दरम्यान शेतीवर कोरोनाचा कोणताही परिणाम झालेला नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात पिकासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे ते म्हणाले.
ग्रामीण भागातील ७० टक्के कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. कृषी भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी भुमिका बजावते. एकूण जीडीपीमध्ये सुमारे १७% योगदान कृषी क्षेत्राचे असून ६०% पेक्षा जास्त लोकांना रोजगार देते. गेल्या काही दशकांत भारतीय शेतीत लक्षणीय वाढ झाली आहे. जरी भारतीय अर्थव्यवस्थेत उद्योगाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, तरीही भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये शेतीचे योगदान नाकारता येणार नाही. देशाच्या अंतर्गत आणि बाह्य व्यापारात भारतीय शेतीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अन्नधान्य व इतर कृषी उत्पादनांचा अंतर्गत व्यापार सेवा क्षेत्राच्या विस्तारास मदत करतो. पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून कृषी हे दोन्ही केंद्र आणि राज्य अर्थसंकल्पांसाठी प्रमुख महसूल गोळा करणारे क्षेत्र मानले जाते. तथापि, सरकार शेतीमधून आणि पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मासेमारी इत्यादी संबंधित कामांतून मोठा महसूल मिळवतात.
Published on: 22 August 2020, 10:58 IST