संग्रामपुर - शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता शेती मशागतिला लागण्याऱ्या यंत्र (ट्रॅक्टर,मोटर सायकल) वाहणाला पेट्रोल,डीझेल मिळण्यासाठी प्रशासनाकडून सुधारित अध्यादेश काढण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
बुलडाणा जिल्हा प्रशासनाने काढलेल्या अध्यादेश मधे पेट्रोल डिझेल कोणाला मिळावे याचे सविस्तर आदेश देऊन अध्यादेश काढला आहे. लॉकडाऊन हे १० मे ते २० मे पर्यंत राहणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची शेतीच्या मशागतीसाठी सुरवात होत असंताना लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शेतकरी शेतिची मशागत करण्यासाठी पारंपारिक शेती अवजारे न वापरता अत्याधुनिक यंत्राचा उपयोग करीत असतो.
त्यामध्ये ( ट्रॅक्टर मोटरसायकल) प्रामुख्याने आहेत. हे माहिती असंताना देखील जिल्हा प्रशासनाने शेती मशागती करिता लागण्याऱ्या सामुग्रीला पेट्रोल व डीझेल भरायला सुट दिली नसल्याने ज्या ट्रॅक्टराच्या भरवशावर जिल्हयातील लाखो एकर जमिनीची मशागत केली जाते.
त्या ट्रक्टरला डीझेल मिळत नसल्याने शेतकरी शेतामध्ये मशागत करणार कशी हा प्रश्न शेतकऱ्यांन समोर उभा राहिला आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने सुधारित अध्यादेश काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी यावेळी केली आहे.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 11 May 2021, 02:45 IST