News

शेतक-यांसह स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा

Updated on 15 July, 2022 7:33 PM IST

शेतक-यांसह स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशाराएकाचवेळी उघडल्या जाणाऱ्या यळगाव धरणाच्यागोडबोले गेटमुळे पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय अडचणीतचिखली : येळगाव धरण भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यात टाकलेले गोडबोले स्वयंचलीत गेट एकाच वेळी पाण्याच्या दबावाने उघडतात. त्यामुळे बुलढाणा,चिखली,मेहकर तालुक्यातील नदी काठालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी घुसुन पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होते. पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी धरणाचे पाणी शेतात घुसुन नुकसान होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी जिल्हाधिकारीबुलढाणा तसेच नगर पालीका मुख्याधिकारी बुलडाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

गत वर्षी सततधार पावसामुळे ऐन सोयाबीन सोंगणीच्या वेळी बुलढाणा येथील येळगाव धरणाचे सांडव्यातील ८० स्वयंचलीत दरवाजे पाण्याच्या दबावामुळे एकाचवेळी उघडल्याने पैनगंगा नदीकाठच्या शेतक-यांचे पुराच्या पाण्याने शेतीपीकाचे नूकसान होऊन जमीनी खरडुन गेल्या होत्या.याच परीस्थीतीचा सामना पैनगंगा नदीकाठच्या शेतक-यांना दरवर्षी करावा लागतो.मागील वर्षी गेटची दुरुस्ती करुन शेतीपीकाचे नुकसान होणार नाही.यासाठी उपाययोजना करुन तोडगा काढावा. स्वयंचलीत गेट ऐवजी मानवचलीत गेट बसवण्यात यावेत.अशी मागणी शेतकरी शिष्ठ मंडळासह माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे,रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधीत विभागाकडे केली होती.त्यानंतर प्रशासनाने खडबडुन जागे होत गेट दुरुस्ती केली होती. परंतु गेट स्वयंचलीतच असल्याने सद्याची परीस्थीती पाहता गेल्या चार ते पाच

दिवसापासुन संततधार पाऊस सुरू असल्याने त्यातच हवामान खात्याने अतिवृष्टी चा इशारा दिल्याने. पैनगंगा नदीकाठचे शेतकरी धास्तावले आहेत.मागच्या वर्षीची पुनरावृत्ती झाली तर यावर्षी सुध्दा जमीन आणि पिके वाहुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यातील छोटे- मोठे तलाव पावसाने भरले आहेत.तर येळगाव धरण सुद्धा भरले आहे.चिखली व बुलढाणा तालुक्यातील पैनगंगा नदीकाठचेयेळगाव,सव,खुपगाव,किन्होळा,सवणा,सोमठाणा,दिवठाणा,पेठ,बेलदरी,बोरगाव,पांढरदेव,देवदरी,घानमोड मानमोड,महिमळ,दहिगाव शिवारातील पैनगंगा नदिकाठावर शेती असलेले शेतकरी चिंतेत आहेत. यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात,सततधार पाऊस सुरु असल्याने येळगाव धरणावर कायमस्वरुपी कर्मचारी देण्यात यावेत,सांडव्यातील स्वयंचलीत गेट धरण भरण्यापुर्वी खुले ठेवण्यात येऊन ,पाण्याचा विसर्ग योग्य प्रमाणात झाल्यास

शेतक-यांचे संभाव्य नुकसान टळु शकते.यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी चिखली तालुक्यातील शेतकर्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी बुलढाणा नगर पालीका यांच्याकडे दि.१३जुलै रोजी करण्यात आली . यावर उपाययोजना न झाल्यास ; येळगाव धरणातील पुराच्या पावसाने शेतीपिकाचे नूकसान झाल्यास यास प्रशासन जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यासाठी वेळप्रसंगी तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी पैनगंगा नदिकाठच्या शेतकर्याचे नुकसान होणार नाही.यासाठी काळजी घेऊ व उपाययोजना करु असे अश्वासन प्रशासनाकडुन शेतकर्याना देण्यात आले आहे.यावेळी विनायक सरनाईक,सतिष सुरडकर,नितिन शेळके,रविराज टाले,अनिल चौहाण,रामेश्वर चिकणे,प्रल्हाद देव्हडे,यासह आदि शेतकरी उपस्थीत होते.

English Summary: The administration is responsible for the damage caused by the flood waters
Published on: 15 July 2022, 07:33 IST