News

साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय (Thalapathy Vijay) आज 48 वर्षांचा झाला आहे. विजय (Thalapathy Vijay Birthday) हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे, त्याने बीस्ट, मास्टर सारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आज विजय इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेत असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मित्रानो असं सांगितले जाते की, विजयला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी मात्र 500 रुपये मिळाले होते. विजय हे 10 वर्षाचे होते तेव्हा त्याचा पहिला चित्रपट वेत्री प्रदर्शीत झाला होता.

Updated on 22 June, 2022 10:16 PM IST

साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय (Thalapathy Vijay) आज 48 वर्षांचा झाला आहे. विजय (Thalapathy Vijay Birthday) हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे, त्याने बीस्ट, मास्टर सारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आज विजय इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेत असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मित्रानो असं सांगितले जाते की, विजयला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी मात्र 500 रुपये मिळाले होते. विजय हे 10 वर्षाचे होते तेव्हा त्याचा पहिला चित्रपट वेत्री प्रदर्शीत झाला होता.

खऱ्या अर्थाने याच चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 18 वर्षाच्या वयात मुख्य अभिनेता म्हणून नल्या थेरपू या चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली. विजय यांनी आज पर्यंत 65 चित्रपट मुख्य भूमिकेत केले आहेत. फोर्ब्सच्या यादीतही विजयचे नाव अनेकदा आले आहे. चला तर मग जाणून घेऊया साऊथ सिनेसृष्टीतील या सुपरस्टारच्या वाढदिवसानिमित्त त्याचा आज पर्यंतचा प्रवास.

लागली ना राव लॉटरी! बँकेत खात नसलं तरी एसबीआई देणार महिन्याकाठी 60 हजार, वाचा

बालपण गरिबीत गेले

जोसेफ विजय चंद्रशेखर यांचा जन्म 22 जून 1974 रोजी मद्रास येथे झाला. त्यांचे वडील एस. चंद्रशेखर हे तमिळ चित्रपट दिग्दर्शक होते तर त्यांची आई शोभा चंद्रशेखर पार्श्वगायिका होती. पण त्याचे वडील चित्रपट दिग्दर्शक असतानाही, विजयने असा काळही पाहिला आहे जेव्हा त्याची आई शोभा पार्श्वगायनातून दिवसाला 100 रुपये कमवत होते, ज्यामुळे तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. ज्या दिवशी त्याच्या आईला काम मिळाले नव्हते त्या दिवशी विजयच्या कुटुंबीयांना उपाशीपोटी झोपावे लागत होते. मात्र विजयचे आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट आला जेव्हा त्याची बहीण विद्या जिचे वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झाले. विजय यांच्या आईच्या म्हणण्यानुसार, विजय लहानपणी खूप सक्रिय असायचा आणि खोडकरपणा करायचा पण त्याची बहीण विद्या हिच्या मृत्यूनंतर विजय शांत आणि उदास राहू लागला.

Monsoon News: पाऊस आला मोठा….! राजधानी मुंबई समवेत 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन

पहिल्या चित्रपटाचे 500 रु

विजयच्या करिअरची सुरुवात खऱ्या अर्थाने 10 वर्षाच्या वयात 1984 मध्ये आलेल्या वैत्री या चित्रपटातून झाली. या चित्रपटात विजय यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते, ज्यासाठी त्याला 500 रुपये फी म्हणून देण्यात आली होती.  यानंतर त्यांनी बाल कलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

वयाच्या 18 व्या वर्षी पहिली मुख्य भूमिका मिळाली

विजयला त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या 'नलैया थिरपू' या चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे वडील या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. हा चित्रपट 1992 मध्ये प्रदर्शित झाला मात्र हा चित्रपट फार काही चालला नाही. त्यानंतर 1992 मध्ये त्यांचा सेंधुरापांडी हा चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पण त्यांना पहिले यश 1994 मध्ये आलेल्या 'रसीगन' चित्रपटातून मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.  या चित्रपटातून विजयला लोकप्रियताही मिळाली. या चित्रपटानंतर विजयने अनेक हिट चित्रपट दिले.

Honda Activa: खरं काय! या ठिकाणी फक्त 10 हजारात मिळतेय होंडा ऍक्टिवा; वाचा संपूर्ण डिटेल्स

फॅनशी लग्न केले

विजय हे चेन्नईमध्ये त्यांचा चित्रपटाचे शूटिंग करत होते.  संगीता यूकेमध्ये राहत होती. आणि विजयची खूप मोठी चाहती होती. एके दिवशी संगीता विजयला भेटायला त्याच्या सेटवर पोहोचली आणि त्यांच्या आगामी चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. दोघांनी आपापले फोन नंबर एकमेकांना शेअर केले आणि ते लांबून बोलू लागले. दोघेही जवळपास 3 वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर एके दिवशी विजयच्या वडिलांनी संगीताला आपल्या घरी बोलावून विजयशी लग्नाचा प्रस्ताव दिला. मग काय संगीता हो म्हणाली. संगीताचे वडील तामिळ व्यापारी होते, त्यांनीही या लग्नासाठी होकार दिला. अशा स्थितीत दोघांचा धर्म वेगळा झाल्यामुळे कोणत्या धर्मात लग्न करायचे हे ठरवणे कठीण होत होते. मग विजय यांनी ठरवलं की संगीताचा हिंदू धर्मावर विश्वास असेल तर हिंदू धर्मानुसार लग्न करावं.  25 ऑगस्ट 1999 रोजी दोघांचे लग्न झाले. या दोघांना दोन मुले आहेत.

100 कोटी फी घेऊन रजनीकांत मागे राहिला

विजय हा सर्वाधिक मानधन घेणारा तमिळ अभिनेता आहे.  थलपथी 65 या चित्रपटासाठी 100 कोटी रुपये फीच्या बाबतीत त्यांनी सुपरस्टार रजनीकांतलाही मागे टाकले आहे.  रजनीकांत यांनी दरबार या चित्रपटासाठी 90 कोटी रुपये शुल्क आकारले होते.

7th pay commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या महिन्यापासून 'इतका' वाढणार पगार

65 चित्रपटांमध्ये काम केले

थलपथी विजय यांनी आजपर्यंत 65 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी त्यांचे बहुतांश चित्रपट हिट ठरले आहेत.  कठ्ठी, मास्टर, थेरी हे चित्रपट त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात.

एकूण 420 कोटी रुपये आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, थलपथी विजयची एकूण संपत्ती 420 कोटी आहे. विजय विलासी जीवन जगतात. विजय यांची वार्षिक कमाई 100 ते 120 कोटींपर्यंत आहे. तो अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती करतो. त्याच्याकडे अनेक आलिशान वाहनांचा संग्रह आहे. अभिनेता चेन्नईतील त्याच्या बंगल्यात कुटुंबासह राहतो.

'थलापथी 66'

सध्या विजय त्यांच्या आगामी 'थलपथी 66' या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.  हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजयसोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे.

English Summary: thalapathy vijay birthday special report
Published on: 22 June 2022, 10:16 IST