News

मागील दोन महिन्यात केंद्र सरकारकडून डिझेलच्या दरात जवळजवळ 10 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आता डिझेलचे दर हे 105 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे.

Updated on 18 May, 2022 10:27 AM IST

Akola :सरकार नागरिकांचे जीवनमान सुधारावे यासाठी निरनिराळ्या योजना राबवत असते. काही योजना या काळाच्या गरजेनुसार बनवले जातात. तर काही योजनेत काळानुसार बदल केले जातात. आता अशीच एक योजना ठाकरे सरकारने राबवली आहे. ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मागील दोन महिन्यात केंद्र सरकारकडून डिझेलच्या दरात जवळजवळ 10 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आता डिझेलचे दर हे 105 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे.

या वाढत्या डिझेलच्या दराचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. परिणामी शेतीच्या मशागतीच्या कामांचे दरदेखील वाढले आहेत. यावर तोडगा म्हणून राज्य सरकारने आता शेतकऱ्यांसाठी (farmers scheme) एक नवी योजना राबवली आहे. ती योजना म्हणजे 'ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे'. या योजनेचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे.

विधवा तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी दरम्यान मदत व्हावी तसेच त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, महिला शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी 'ट्रॅक्टर आमचा, डिजेल तुमचे', हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रथम ही योजना देशात प्रथमच अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. निश्चितच ही योजना राज्याला व देशाला मार्गदर्शक ठरणार आहे. कामगार राज्यमंत्री नेते बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

सोमवार (दि.16) ला या उपक्रमाचा शुभारंभ झाला. वरुळ-जऊळका ता.अकोट येथील सिमा काठोळे यांच्या शेतात हा शुभारंभ पार पडला. त्यावेळी मंत्री कडू यांनी माहिती दिली. शेतकरी कुटुंबात पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी ही महिलांवर येते. पण नांगरणी, वखरणी, पंजी आणि पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून? असे अनेक प्रश्न त्यांच्या सामोर उभे असतात. त्यात त्यांना सहाय्य व्हावे यासाठी हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे. असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.

अकोला जिल्ह्यातील सर्व निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांचे आर्थिक स्वालंबन होण्यास मदत करणारी ही योजना असेल. तसेच हा उपक्रम यशस्वी झाला तर राज्यभर हा प्रकल्प राबविण्यासाठी आपण प्रयत्न करु असे देखील बच्चू कडू यांनी सांगितले.

त्या अनुषंगाने शासनाच्या 'विविध योजनां'च्या माध्यमातून विधवा शेतकरी महिलांकरिता 'पेरणी ते कापणी' दरम्यान शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चाकरिता मदत करण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले. दरम्यान या कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी मंत्री बच्चू कडू यांनी स्वतः शेतात ट्रॅक्टर चालवत नांगरणी केली.

महत्वाच्या बातम्या:
सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेली ही लेक आता क्रिकेटचे मैदान जिंकणार आहे 
Yellow Alert To 13 District: महाराष्ट्रात येत्या तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज
अतिरिक्त उसासाठी आता मुख्यमंत्री रिंगणात, घेतला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा

English Summary: Thackeray government's big announcement; Now farmers will get free tractors for cultivation
Published on: 18 May 2022, 10:27 IST