News

ज्या शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्ज परतफेडीचा तगादा लावू नये असे आदेश त्यांनी दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Updated on 27 March, 2022 3:28 PM IST

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी केला आहे. असे असताना आता सहकारमंत्र्यांनी अजून एक निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्ज परतफेडीचा तगादा लावू नये असे आदेश त्यांनी दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

तसेच महात्मा जोतीराव फुले (Loan waiver) कर्जमुक्ती योजनेतून ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला नाही त्यांना या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ दिला जाणार आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे. तसेच हे आदेश पाळले गेले नाहीत तर या बँकांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे बँकांनी देखील याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे.

त्यामुळे आता कर्जमाफी झाल्यात जमा असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक पातळीवर व्याजाची रक्कम अदा केली तरच कर्जमाफीचा लाभ असा अपप्रचार केला जात होता. पण थेट सहकार मंत्र्यांनीच याबाबत माहिती दिल्याने आता शेतकरी आनंदात आहेत. तसेच किरकोळ कारणांनी कर्जमाफी झाली नसेल अशा शेतकऱ्यांनाही त्याची परतफेड करावेच असे नाही.

अनेक ठिकाणी स्थानिक पातळी व्याजाची रक्कम अदा केली तरच योजनेचा लाभ असे म्हणत वसुली केली जात आहे. अशा पध्दतीने बॅंका वसुली करीत असतील तर शेतकऱ्यांनी सहकार विभागाशी संपर्क करुन तक्रार नोंदवता येणार आहे. याबाबत बॅंक अधिकाऱ्यांनी काही सांगितले तरी शेतकऱ्यांनी कर्जफेड करु नये, असेही सांगण्यात आले आहे.

तसेच आता अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेप्रमाणे वर्षभरात या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही 50 हजाराची रक्कम दिली जाणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. कोरोनामुळे ही रक्कम देण्याचे लांबले असले तरी आता याबाबत अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ही रक्कम देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
...म्हणून मला त्या फाइलवर सही करावी लागली!! आणि शेतीत बदल घडवायचा असे मी मनाशी पक्के ठरवले
बिबट्या सफारी बारामतीला हलवणार? अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण
CNG GAS; अजितदादांनी करून दाखवलं!! राज्यात एप्रिलपासून सीएनजी गॅस होणार स्वस्त

English Summary: Thackeray government's aggressive decision, now the tension of farmers regarding debt waiver is gone
Published on: 27 March 2022, 02:40 IST