कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणासाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.
पंचगंगेने आज (दि.२४) रोजी इशारा पातळी ओलांडली आहे. तर धोका पातळी ४३ फुट आहे. त्यामुळे आजही पावसाचा जोर कायम राहिला तर राधानगरी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे देखीव उघडण्याची शक्यता आहे.
धरण क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून मुसळधारेने हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर राधानगरी धरण सध्या ९० टक्के भरले असून धरणातून सध्या १४०० क्यूसेक नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाल्यास सर्वप्रथम फटका करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि चिखली गावाला बसतो. त्यामुळे या गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
८३ बंधारे पाण्याखाली
जिल्ह्यातील जोरदार पावसाने विविध नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे ८३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे थेट संपर्क तुटल्याने वाहतूक अन्य मार्गाने सुरु आहे.
Published on: 24 July 2023, 12:09 IST