News

इंडियन एअर फोर्समध्ये जॉब मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

Updated on 13 April, 2021 11:19 PM IST

इंडियन एअर फोर्समध्ये जॉब मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

यात गट सी मध्ये स्टेनो, अधीक्षक, कुक,  घरगुती कर्मचारी, मल्टी टास्किंग स्टाफ अशा विविध प्रकारच्या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. जवळ-जवळ 1524 रिक्त पदे असल्याचे इंडियन एअर फॉर्सने जाहीर केले आहे. यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही इंडियन एअर फॉर्सचे अधिकृत संकेतस्थळ indianairforce.nic. in पर अर्ज करू शकता.  या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन मे 2021 आहे.

हेही वाचा : आता घरकाम करणाऱ्या नोकरांनाही मिळणार किमान वेतन, ईएसआय-पीएफचीही सुविधा!

 भरतीसाठीची नियमावली

 इंडियन एअर फोर्समध्ये ग्रुपसी साठी होणाऱ्या भरती साठी विविध पदांकरिता वेगळे पात्रता भागविण्यात आले आहेत. यासाठी वयोमर्यादा ही 18 ते 25 निश्चित करण्यात आले आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातील अनुसूचित जाती, एस टी, ओबीसी तसेच दिव्यांग उमेदवारांना विशेष सवलत देण्यात आली आहे.

 

विविध पदांकरिता शिक्षण पात्रता

 इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंगचा एक वर्षाचा अनुभव असलेल्या वरिष्ठ संगणक ऑपरेटरसाठी गणितातील पदवी किंवा आकडेवारीचे मागणी केली गेली आहे. अधीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातूनपदवी किंवा समकक्ष पात्रता तसंच स्टेनो जीआर-ll साठी उमेदार बारावी पास असणे आवश्यक आहे.  लोअर डिव्हिजन लिपिक या पदासाठी ही बारावी ची पात्रता सुचित करण्यात आली आहे, तसेच संगणकात टायपिंग स्पीड इंग्रजीमध्ये 35 डब्ल्यू पीएम तसेच हिंदीमध्ये 30 डब्ल्यू पी एम असावा.  तसेच हिंदी टायपिस्टसाठी बारावी पास सह कम्प्युटर टायपिंगचा स्पीड हा इंग्रजीमध्ये 35 डब्ल्यू पीएम शिवा हिंदीमध्ये 30 डब्ल्यू पीएम असावा.  स्टोर कीपर या पदासाठीबारावी पास ही पात्रता आवश्यक आहे.

 

परीक्षेचे स्वरूप

 भारतीय वायुसेना गट सी मध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षांमध्येजनरल इंतेलिजन्स अंड रीजनिंग, न्यूमेरिकल a एप्टीट्यूड, जनरल इंग्लिश,  जनरल अवरेनेसइत्यादी संबंधित प्रश्न विचारले जातील.  ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोघा भाषांमध्ये घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग आणि शारीरिक चाचणी विरुद्ध हवाईदलातील स्टेशन युनिटमध्ये केले जाणार आहेत.

 माहिती स्त्रोत- सकाळ

English Summary: Tenth-twelfth grade students get a golden opportunity in the Indian Air Force
Published on: 13 April 2021, 11:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)