केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही होय. आपल्याला माहित आहेच कि या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातात
आज पर्यंत या योजनेअंतर्गत नऊ हपत्याचे वितरण करण्यात आले आहे. पुढील दहावा हप्ता एक जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत एकूण दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले असून ई केवायसी न केल्यावरही हप्ता मिळणार आहे. परंतु मार्च 2022 नंतर लाभ मिळवायचे असतील तर मार्च 2022 पर्यंत ई केवायसी करणे गरजेचे आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील जवळजवळ अकरा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.
मागे या योजनेत अनियमितता झाल्याचे आढळून आल्याने शासनाने कडक पावले उचलीत अशा शेतकऱ्यांकडून दिली गेलेली रक्कम परत घेतली आहे. जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर या योजनेअंतर्गत जवळ जवळ एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी सांगितलेले आहे.
Published on: 30 December 2021, 01:51 IST