देशात यंदा सुमारे 350 लाख गाठींचे उत्पादन होणार आहे. दुसरीकडे वस्त्रोद्योगाची मागणी टिकून राहणार आहे. कारण सूत, कापड निर्यातीची गती कायम असून रुईची निर्यातही वाढेल, कापसाचा साठा नव्या हंगामात फक्त ५० लाख गाठी एवढा आहे. साठ्यात कमालीची घट गेल्या दोन वर्षात झाली आहे. २०२०-२१ मध्ये देशातील जिनिंग उद्योग हवा तसा कार्यरत नव्हता.
कारण सरकारने कापूस खरेदीत आघाडी घेतली. सरकारकडून सूत गिरण्या, वस्त्रउद्योगाला रूई किंवा कापूस गाठींचे खरेदी करावी लागत होती. यंदाही अशीच स्थिती देशात राहणार आहे. सरकार बाजारातून कापसाची सर्वााधिक खरेदी करील. कापसाच्या हमीभाव सरकराने वाढविला आहे. देशातून रुईची निर्यातही वाढेल. देशात लागवड झाली आहे. शिवाय खरिपात नैसर्गिक समस्यांचा सामनाही महाराष्ट्र, गुजरात, तेलगंणाला पुन्हा एकदा करावा लागत आहे. यामुळे कापसाचे उत्पादन कमी राहील, हे देखील स्पष्ट झाले आहे.
भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वस्त्रोद्योग आहे. दरवर्षी सुमारे साडेपाच हजार कोटी किलोग्रॅम सूत उत्पादन घेतले जाते. देशात सुमारे १८०० सूत गिरण्या आहेत. यातील ४०० सूत गिरण्या एकट्या तामिळनाडूत आहेत.महाराष्ट्रात १५३ सूत गिरण्या आहेत गुजरातेत सुमारे २१ गिरण्या आहेत. दरम्यान लॉकडाऊनमुळे गिरण्याचे काम ठप्प होते. जगभरात कोरोना काळातही कापड उद्योगाची चाके गतिमान झाल्यानंतर सूत गिरण्याचे काम सुरू झाले आहे.
देशातील सर्वच सूत गिरण्या ९५ टक्के क्षमतेने सध्या कार्यरत आहेत. या सूत गिरण्यांना रोज ८० हजार गाठींची गरज असते, कोरोनामुळे देशात यंदा शिलकी साठा विक्रमी स्थितीत पोहचला. १२० लाख गाठी देशात शिल्लक राहिल्या. परंतु देशातील वस्त्रोउद्योगाने गती घेतल्याने शिल्लकी साठा कमी होत आहे. जगात गेल्या हंगामात २०२१९-२० मध्ये तीन कोटी ४२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली होती. ही लागवड तीन २०२०-२१ मध्ये तीन कोटी २२ लाख हेक्टर एवढी झाली. यंदा यात आणखी सुमारे १४ टक्के घट आली आहे. याामुळे कापसासाठी बांग्लादेश , व्हिएतनाम, चीन, भारताकडे पुन्हा येतील.
Published on: 22 August 2021, 11:51 IST