महावितरण विभागाचा पुन्हा एकदा घाळ कारभार पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे पाहायला भेटला आहे. आलेलं पीक अनेक वेळा जळाले आहे अशी घटना आपण अनेक वेळा पाहिली आहे. अशा घटनेवर उपाययोजना तसेच त्यावर कोणते उपाय करता येतील यामध्ये महावितरण विभागाला पुन्हा एकदा अपयश धारण झाले आहे. काल अचानक नारायणगाव मधील कळमजाई मळ्याला आग लागली जे की वस्तीवर कोणीही नसल्यामुळे तिथला जवळपास दहा ते बारा एकर उसाला आग लागून पूर्ण उसाची खाक झाली आहे. उसाला तर आग लागलीच मात्र सोबत शेती कामासाठी जो ट्रॅक्टर वापरण्यात येत होता त्या ट्रॅक्टर ला सुद्धा आग लागली आणि तो ही जळाला. अमित रोहिदास भोर या शेतकऱ्याचा तो ट्रॅक्टर होता.
आगीच्या भक्ष्यस्थानी या शेतक-यांचा ऊस :-
आगीच्या झालेल्या घटनेमध्ये अनेक शेतक-यांचा ऊस जळून खाक झाला महावितरणच्या घाळ कारभारामुळे ज्या शेतकऱ्यांचा हा ऊस जळून खाक झाला आहे त्या शेतकऱ्यांची नावे अर्जुन भोर, विठ्ठल भोर, विष्णु भोर, इंदुबाई कुरकुटे, हनुमान खंडागळे आणि बारकु भोर अशी आहेत. दरवेळी महावितरणच्या घाळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे मात्र अजून कोणतीही कारवाई होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्याना नुकसानभरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
ज्या ठिकाणी आगेची घटना झाली त्या घटनेनंतर आगीच्या ठिकाणी युवक अध्यक्ष सुरज वाजगे, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सदस्य मयुर विटे, निलेश दळवी, तुषार टेमकर, अनिकेत भोर, राजेश भोर, अविनाश भोर या सर्वांसह तेथील गावातील स्थानिक लोक सुद्धा पाहणी करण्यास त्या ठिकाणी पोहचली जोती जे की या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी त्यांची सुद्धा मागणी आहे. चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी कारखान्याचे खोडद गटप्रमुख रमेश जाधव व फिल्डमन पवन गाढवे यांना घटनेस्थळी पाठवून दोन दिवसात जळालेल्या उसाची तोडणी केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
महावितरणाचा गभाळ कारभार :-
राज्यभरात अशा घटना घडत असल्याने वारंवार महावितरण अधिकाऱ्यांवर शेतकरी वर्गाच्या टीका महावितरणावर होत आहेत मात्र अजूनही महावितरण विभागाच्या कोणत्याचअधिकाऱ्याकडून उपाय योजना झाली नाही असे चित्र या घटनेमधून पाहायला भेटत आहे तसेच दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे पीक सुद्धा जळून खाक होत असल्याचे विचित्र चित्र समोर येत आहे.
Published on: 02 February 2022, 03:57 IST