News

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर यावर्षी निसर्गाची चांगलीच मोठी अवकृपा बघायला मिळत आहे. खरीप हंगामात म्हणजेच मृग नक्षत्रात अनेक ठिकाणी पावसाने दांडी मारली आणि त्यामुळे खरीप हंगामाला उशिर झाला. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले.

Updated on 05 December, 2021 9:32 PM IST

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर यावर्षी निसर्गाची चांगलीच मोठी अवकृपा बघायला मिळत आहे. खरीप हंगामात म्हणजेच मृग नक्षत्रात अनेक ठिकाणी पावसाने दांडी मारली आणि त्यामुळे खरीप हंगामाला उशिर झाला. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले.

खरीप हंगाम हातचा गेला तरी शेतकऱ्याने हार न मानता रब्बी हंगामाकडे वाटचाल केली पण ह्या हंगामात अवकाळी जणु काळचं बनून आला, ह्या बेमौसमी पावसाचा कांदा समवेत अनेक पिकावर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे, कांदा पिकावर करपा व इतर बुरशीजनीत रोग अटॅक करत आहेत. शिवाय अवकाळी पाऊस फळबाग पिकांना चांगलाच घातक ठरत आहे आणि यामुळे फळबागायतदार पुरता हवालदिल झाला आहे. राज्यात द्राक्षे लागवड मोठया प्रमाणात केली जाते, पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात राज्याच्या एकूण लागवडीच्या 70 टक्के लागवड आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. असे सांगितले जात आहे की, द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे दहा हजार कोटींचे न भरून निघणारे अवाढव्य नुकसान झाले आहे.

 द्राक्षे बागायतदारांच्या मते राज्यातील भरपुर बागा ह्या काढणीसाठी सज्ज झाल्या होत्या, पण या अवकाळीने यापैकी 50 टक्के बागा प्रभावित झाल्या. त्यामुळे द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असेच म्हणावे लागेल. द्राक्षे पिकाचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे काढणी आणि काढणीला आलेल्या ह्या बागांचे अवकाळीने मोठं नुकसान केले त्यामुळे द्राक्षे बागायतदार भल्या मोठ्या संकटात सापडल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

काही भागात द्राक्ष काढणीला आला होता तर काही भागात फळछाटणी आटपून झाली आहे आणि तिथे द्राक्ष बागा फुलोराच्या अवस्थेत आहेत. पण गेल्या पंधरावाड्यापासून वातावरणात झालेला बदल व अवकाळी मुळे ह्या बागावर फुलगळ, फळकूज यासारख्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. तसेच द्राक्षे बागांवर डाउनी आणि भुरी रोगांचा अटॅक देखील बघायला मिळत आहे. अजूनही वातावरण स्वच्छ नसल्याने हा धोका अधिक वाढेल की काय अशी शंका बागायतदारांच्या मनात घर करून बसली आहे.

फळबागसाठी बागायतदार शेतकरी लाखो रुपये खर्च करतात आणि जर अशी परिस्थिती असली तर लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या पदरी फक्त निराशाच पडेल आणि शेतकरी निश्चितच कर्जबाजारी होईल.

राज्यात आता बऱ्याच भागात द्राक्षे लागवड होत आहे, जवळपास चार लाख हेक्टरवर द्राक्षे बागा लावण्यात आल्या आहेत. या एवढ्या मोठया क्षेत्रातून जवळपास वीस हजार कोटींची उलाढाल होते पण यंदा अवकाळीने एकाच झटक्यात हि उलाढाल निम्म्यावर आणून ठेवली आहे. आता शिल्लक राहिलेल्या द्राक्षेला कसा मोबदला मिळतो यावर द्राक्ष उत्पादक शेतकरी अवलंबून आहेत.

English Summary: ten thosand crore damage of grape productive farmer in maharashtra
Published on: 05 December 2021, 09:32 IST