News

निसर्गाच्या चढ-उतारामुळे अजूनही खरीप हंगाम पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो मात्र पावसाने जोरात हजेरी लावल्याने शेतकरी आपली निराशा व्यक्त करत आहेत. मागील आठवड्यात राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली आणि फुलांचा बाजार जोरदार वाढला गेला. तसेच दसरा सण असल्याने तर बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली होती. झेंडू च्या फुलाला दसरा मनात महत्वाचे स्थान दिले जाते.

Updated on 16 October, 2021 11:41 AM IST

निसर्गाच्या चढ-उतारामुळे अजूनही खरीप हंगाम पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे.खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या(farmers) उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो मात्र पावसाने जोरात हजेरी लावल्याने शेतकरी आपली निराशा व्यक्त करत आहेत. मागील आठवड्यात राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली आणि फुलांचा  बाजार  जोरदार  वाढला  गेला. तसेच  दसरा सण असल्याने तर बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली होती. झेंडू च्या फुलाला दसरा मनात महत्वाचे स्थान दिले जाते.

झेंडूच्या फुलाला ८० ते १०० रुपये प्रति किलो दर मिळत आहे:

बाजारात झेंडूच्या फुलांची आवक कमी आहे मात्र मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने दरही चांगल्या प्रमाणत मिळत आहेत. मोठ्या बाजारपेठेत झेंडूच्या फुलाला प्रति किलो ५०  ते  ६०  रुपये दर मिळत आहे तर किरकोळ बाजारात झेंडूच्या फुलाला ८० ते १०० रुपये प्रति किलो दर मिळत आहे.यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपल्यामुळे  सर्वकाही  पाण्यात  बुडून  गेले  आणि शेतकऱ्यांचे सुद्धा आर्थिक नुकसान झाले तसेच बाजारात सुद्धा मालाला भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात अडकला गेला आणि या परिस्थितीत ज्या  शेतकऱ्यांनी  झेंडू फुलवला आहे त्यांना चांगल्या प्रमाणत दिलासा मिळालेला आहे.झेंडूच्या फुलांसोबत आपट्याची पाने तसेच शेवंती व  आर्टिफिसीअल फुलांना सुद्धा मुंबई  मधील एपीएमसी  मार्केट परिसरात  ग्राहकांची गर्दी पाहायला भेटली.

पावसाचा परिणाम उत्पादनावरही:-

यावेळी पावसाने आपले जोरदारपणे आगमन केल्यामुळे इतर पिकांवर तर मोठ्या प्रमाणात परिणाम झालाच त्याबरोबर झेंडूच्या फुलावर सुद्धा मोठ्या प्रमाणत परिणाम झाला. मराठवाड्यात जास्त पाऊस झाल्याने फुलांची आवक कमी झालेली आहे असे तेथील व्यापारी वर्ग सांगत आहे तर इकडे दसरा सणामुळे मार्केट मध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी करण्यास गर्दी पाहायला मिळत आहे.

या भागातून फुलांची आवक:-

मुंबई शहरातील एपीएमसी मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यास ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. झेंडूच्या फुलांचे दर वाढले असले तरी सुद्धा ग्राहकांचा तेवढाच जोश आपल्याला पाहायला भेटत आहे. मुंबई मार्केट सोबतच सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह अनेक भागातून झेंडूच्या फुलांची आवक झालेली आहे तर दुसऱ्या फुलांची सुद्धा आवक झालेली आहे.

काय आहेत फुलांचे दर:-

किरकोळ बाजारामध्ये झेंडूच्या फुलांचे दर प्रति किलो ८० ते १०० रुपये आहेत तर ठोक बाजारात झेंडूच्या फुलांचे दर प्रति किलो ५० ते ६०  रुपये  आहेत. शेतकरी आणि  ग्राहकांच्या  मध्ये असणारा जो दलाल आहे त्याला यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.गुलछडी चा दर प्रति किलो १२०-२०० रुपये आहे तर बिजली चा दर प्रति किलो ५०-१०० रुपये आहे. शेवंती चा दर प्रति किलो ८० ते १५० रुपये आहे तर जुई चा दर १०० ते १५० रुपये आहे. चमेली चा दर १३००, कार्नेशन चा दर ८० ते १५० रुपये आणि जरबेरा चा दर २० ते ४० रुपये आहे.

English Summary: Temples open, markets flourish during festive season marigold flowers getting good price
Published on: 16 October 2021, 11:40 IST