मार्च महिन्याच्या अखेरीस राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पुर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या तापमानात चढ-उतार सुरू होता. मात्र दोन दिवसांपासून पुर्वमोसमी पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. तापमान ३७ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या असून उन्हाचा चटका वाढला आहे. दरम्यान राज्यातील काही भागात तापमान वाढले असतानाच विदर्भात आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी ४०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. तर सोलापूर येथे ३९.६ अंश, अकोल येथे ३९.५ अंश सेल्सिअस तापमान होते. दरमयान मराठवाड्यापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. रविवारपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
Published on: 03 April 2020, 02:30 IST