News

राज्यात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा सुरू असतानाच उन्हाचा चटकाही वाढत आहे. राज्याच्या अनेक भागात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. मालेगाव यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Updated on 02 April, 2020 10:58 AM IST

राज्यात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा सुरू असतानाच उन्हाचा चटकाही वाढत आहे.  राज्याच्या अनेक भागात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे.  मालेगाव यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या महिन्यात २४ मार्च रोजी विर्दभातील अकोला येथे ४०. अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे ४०.४ सेल्सिअस तापमान नोंदले गेलेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. दरम्यान विदर्भातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  उर्वरीत राज्यात मुख्य़त उष्ण कोरड्या हवामानाच अंदाज आहे. रविवारपासून मराठवाड्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  आयएमडीच्या अहवालानुसार, नैऋत्य मध्य प्रदेश व विदर्भात समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तसेच नैऋत्य मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर कर्नाटक व मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे ३ व ४ एप्रिल रोजी मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.

English Summary: Temperature high in malegaon , and rain posibility in vidarbha
Published on: 02 April 2020, 10:56 IST