जनावरांमध्ये कोरोना व्हायरसची (COVID-19) लागण होते का याविषयीच्या चर्चा परत सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपुर्वी वाघाला कोरोनाची लागण झालीची बातमी माध्यमात आली होती. त्याआधी एका पॉमोरियन कुत्र्याचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. अशातच पाळीव जनावरांना कोरोनाची लागण होते का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याचीच प्रचिती तेलंगाणामधील खम्मम जिल्ह्यात आली. येथील एका शेळीपालन करणाऱ्या व्यक्ती चक्क शेळ्यांना मास्क लावले आहेत.
कल्लूर मंडल असे अशा व्यक्तीचे नाव आहे. मंडल यांच्या मते शेळ्यांमध्येही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे आपण शेळ्यांना मास्क लावल्याचे ते म्हणाले. कोरोनाने जगभरात कहर माजवला आहे. अनेकांचा जीव या विषाणूमुळे गेला आहे. दरम्यान भारतातही या विषाणूने आपले पाय पसरवले असून छोट्या छोट्या शहरातही याचा पैलाव होताना दिसत आहे. यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. वाघाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी कानी पडल्यानंतर आपल्या मनात शेळ्यांविषयी चिंता वाढू लागल्याचे मंडल म्हणाले. जर जनावरांमध्ये हा विषाणू सक्रिय झाला तर जनावरांचे कसे होईल, अशी चिंता त्यांना सतावत आहे. दरम्यान तेलंगाणा येथे कोरोनाचा कहर अधिक दिसत असून या विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाऊनचे कडक पालन केले जात आहे.
Published on: 11 April 2020, 04:55 IST