गेल्या महिन्यात कांद्याचे दर प्रत्येक दोन दिवसाला वाढताना पाहायला भेटले होते मात्र आता रात्रीत दर घसरले असताना पाहायला भेटत आहे. गेल्या महिन्यात कांद्याचा दर प्रति क्विंटल ३ हजार रुपये होता मात्र मार्च मध्ये अचानक एका रात्रीत दर घसरले असल्याने शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी आले आहे. तीन हजार प्रति क्विंटल दरावरून थेट हजार रुपये च्या आतच कांद्याचे दर आले असल्याने सर्वत्र कांद्याच्या दराची च चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातील कांद्याची मुख्य बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला ओळखले जाते. मागील आठवड्यात बुधवारी कांद्याचे दर ४२५ रुपये ने घसरला आहे जे की अजून बाजारपेठेत उन्हाळी कांदा पूर्ण क्षमतेने आलेला नाही.
कांद्याचे दर घटण्यामगील काय आहे कारण :-
देशातील गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश तसेच पश्चिम बंगाल राज्यातील सुखसागर या ठिकाणी लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे तर महाराष्ट्र राज्यात नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागात सुद्धा उन्हाळी कांद्याची आवक लाल कांद्याप्रमाणे सुरू असल्याने कांद्याच्या दरावर याचा थेट परिणाम होत आहे. बाजारपेठेत कांद्याची मागणी कमी आणि कांद्याची आवक जास्त होत असल्याने असे चित्र पाहायला भेटत आहे. गेल्या महिन्यात जरी कांद्याची आवक जास्त होत असली तरी त्याच प्रमानत मागणी सुद्धा होती त्यामुळे जास्त असा काय परिणाम दरावर बघायला भेटला नाही.
लासलगाव बाजार समितीत काय आहे चित्र :-
मागील महिन्यात लासलगाव बाजार समितीमध्ये २२ हजार ४५ क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. जे की कांद्याला कमाल दर १५५१ रुपये तर किमान दर ५०० रुपये अशा प्रकारे १३०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. ते गेल्या सोमवारी ९०० वाहनातून ३२ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत झालेली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल ११८० रुपये दर तर किमान ४०० रुपये या प्रमाणात दर मिळाला आहे. जे की कांद्याला सर्वसाधारणपणे ८७५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे.
अवकाळी व ढगाळ वातावरणाचा परिणाम :-
वातावरणात अचानकपणे अवकाळी तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्यामुळे शेतकऱ्यानी तातडीने कांद्याची काढणी सुरू केली. शेतात कांदा ठेवून नुकसान होण्यापेक्षा बाजारात दाखल करून थोडेफार पैसे तरी भेटतील असे शेतकऱ्यांचे मत होते. जे की या कारणामुळे बाजारपेठेत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली त्यामुळे कांद्याचे दर घसरायला सुरू झाले.
Published on: 20 March 2022, 07:34 IST