News

एक उत्तम शिक्षिका हे भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत द्रोपदी मुर्मु यांचा प्रवास खूपच थक्क करणारा आहे. ओडिसा राज्यातील एका शहराच्या नगरसेविका ते आता देशाच्या प्रथम नागरिक पदी विराजमान होत आहेत द्रोपदी मुर्मु. एवढेच नाही तर आदिवासी समाजातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपती एवढीच त्यांची ओळख करून भागणार नाही.

Updated on 22 July, 2022 10:07 AM IST

 एक उत्तम शिक्षिका हे भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत द्रोपदी मुर्मु यांचा प्रवास खूपच थक्क करणारा आहे. ओडिसा राज्यातील एका शहराच्या नगरसेविका  ते आता देशाच्या प्रथम नागरिक पदी विराजमान होत आहेत द्रोपदी मुर्मु. एवढेच नाही तर आदिवासी समाजातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपती एवढीच त्यांची ओळख करून भागणार नाही.

या प्रवासा मागे त्यांची जीवनातील संघर्षाचे काळ सुद्धा तेवढेच हलवून टाकणारे होते. अनेक प्रकारचे चढ-उतार, आलेले नैराश्य व त्या नैराश्यावर यशस्वी त्यांनी केलेली मात हे कुणालाही प्रेरणादायी ठरेल असे आहे.

 द्रोपदी मुर्मु यांच्या शिक्षणापासून…..

 1979 मध्ये त्यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी महिला कॉलेजमधून पदवी घेतली व त्यानंतर पहिली नोकरी मुलीची राज्यसरकारच्या सिंचन विभागांमध्ये, परंतु या ठिकाणी त्यांचे मन रमत नसल्यामुळे त्या मयूरभंज मधील कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या.

परंतु राजकारणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 1997 हे ते वर्ष त्यांच्यासाठी मोठे कलाटणी देणारे ठरले. या वर्षी त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला व मयूरभंजच्या रंगरायपुर वार्डातुन निवडून त्या नगरसेविका झाल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

सलग दोन वेळा आमदार आणि 2000 ते 2004 या काळात ओडिसा सरकारमध्ये राज्यमंत्री झाल्या 2015 मध्ये झारखंड राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

नक्की वाचा:देवेंद्र फडणवीस करणार परतफेड? अजितदादांसाठी 'ती' जागा सोडण्याची शक्यता..

द्रोपदी मुर्मु यांनी शिक्षण घ्यावे ही त्यांच्या आजीची होती इच्छा

 ओडिशा सारख्या दुर्गम भागात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यातील बहुतांश लोक अशिक्षित होते. याच भागात राहणाऱ्या द्रौपदी यांच्या आजी थोडी इंग्लिश बोलत होत्या हे विशेष.

परंतु त्यांना काय वाटायचे की,आपल्या नातीने शिक्षण घ्यावे व त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले. याचाच परिणाम म्हणून राजधानी भुवनेश्वरला जाऊन शिकणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

 दुःखाचे एकामागून एक धक्के

 कायम हसरा चेहरा असणाऱ्या द्रोपदी मुर्मु यांच्या देखील अनेक वेदना लपलेले आहेत. 2009 ते 2015 हा कालावधी त्यांच्यासाठी खूपच दुःख देणारा ठरला.

या कालावधीमध्ये त्यांनी पती, त्यांची दोन्ही मुले, आई आणि भाऊ यांना त्यांनी कायमचे गमावले. त्यानंतर त्या खूपच नैराश्यात गेल्या होत्या. जीवन जगणे नकोसे असताना त्यांनी स्वतःला सावरले व आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले.

नक्की वाचा:आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या महत्वाच्या योजना सुरु, ‘यातरुणांना मिळणार उद्योगासाठी आर्थिक मदत

राजकारणातले ते पंचवीस वर्ष

 द्रोपदी मुर्मू यांचा जन्म कुसुमी ब्लॉकच्या उपरबेडा गावातील एका संथाल आदिवासी कुटुंबात 20 जून 1958 मध्ये झाला. त्यांचा विवाह शाम चरण मुर्मु यांच्याशी झाला होता. 1997 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून नगरसेवक ते भाजपच्या ओडिशा शाखेच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष झाल्या.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मुर्मु मानद सहाय्यक शिक्षक व सिंचन विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर ही नोकरी करीत होत्या. ओडिसा विधानसभेत सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून निलकंठ पुरस्काराने त्यांचा गौरवही झाला होता.

नक्की वाचा:महत्वाची मागणी:व्याज माफ सवलतीत सहकारी बँकांचा समावेश करा, राजू शेट्टी यांची नारायण राणेंकडे मागणी

English Summary: teacher to president of india that is so inpirational journey of droupadi murmu
Published on: 22 July 2022, 10:05 IST