गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा याचा फटका बसत आहे. असे असताना टाटा पॉवरची उपकंपनी असलेली टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड राज्यात सोलापूर येथे 150 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी महावितरणने टाटा पॉवरला 'लेटर ऑफ अॅवॉर्ड' दिले आहे. यामुळे याबाबत आता तयारी सुरू झाली आहे. यामुळे मोठी वीजनिर्मिती होणार आहे. दरम्यान ऊर्जा वापराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीवर भर दिला जात आहे.
यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी महावितरणने टेंडर मागवले होते. त्यामध्ये टीपीआरएलला सदरचे टेंडर मिळाले आहे. आता काही दिवसांमध्ये कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे मोठा लोड कमी होणार आहे.
पुन्हा पाऊस! पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता..
वीज खरेदी करार लागू करण्यात आलेल्या तारखेपासून 18 महिन्यांमध्ये हा प्रकल्प सुरू करावा लागणार असल्याचे टीपीआरएलचे सीईओ आशीष खन्ना म्हणाले. या प्रकल्पामुळे आता टीपीआरएलची एकूण अपारंपरिक ऊर्जा क्षमता 5786 मेगावॅटवर पोहोचणार आहे.
ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा, ट्वीटद्वारे केलं जाहीर
दरम्यान, राज्यात दिवसा वीज देण्यासाठी शेतकरी आग्रही आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी अनेकदा आंदोलने देखील करण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना शेती कर्जासाठी सीबीलची अट नको, शेती करणे झाले अवघड
लाल मिरची 700 रुपये किलो, उत्पादन घटल्याचा परिणाम
मोर्चा इफेक्ट! आता खाजगी वजन काट्यावरून वजन करून आणलेल्या ऊसाचे वजन ग्राह्य धरले जाणार
Published on: 14 November 2022, 02:59 IST