News

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह विदर्भ व कर्नाटकामधून चिंचेची आवक होत आहे. बुधवारी बाजार समितीमध्ये २३६ क्किंटल आवक झालेल्या चिंचेला ७ हजार ते १२ हजार ५००तर सरासरी ९ हजार ५०० रुपये प्रतिक्किंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

Updated on 22 February, 2021 10:46 PM IST

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह विदर्भ व कर्नाटकामधून चिंचेची आवक होत आहे. बुधवारी बाजार समितीमध्ये २३६ क्किंटल आवक झालेल्या चिंचेला ७ हजार ते १२ हजार ५००तर सरासरी ९ हजार ५०० रुपये प्रतिक्किंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये अजून चिंचेची आवक सुरू होणे बाकी आहे, तर जालना समितीमध्ये मंगळवारी केवळ एकवेळ चिंचेची ४ क्किंटल आवक झाली. या चिंचेला ६००० ते १० हजार रुपये प्रतिक्किंटल दरम्यान दर मिळाला चिंचेचा सरासरी दर ८ हजार रुपये प्रति क्किंटल राहिल्याची माहिती जालना बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. लातूर बाजार समितीमध्ये जवळपास पंधरवड्यापासून चिंचेची आवक होते आहे. १३ फेब्रुवारीला ७३ क्किंटल, १४ फेब्रुवारीला  ५५ क्किंटल १५ फेब्रुवारीला १०२ क्किंटल , तर १६ फेब्रुवारीला २१२ क्किंटल चिंचेची आवक झाली. या चिंचेला बाजार समितीत सरासरी ६ हजार ते १५ हजार दरम्यान प्रतिक्किंटलचे दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

 

लातूर बाजार समितीत लातूर जिल्ह्यासह विदर्भ व कर्नाटकातूनही चिंचेही आवक होते आहे. तूर्त आवक कमी असली तरी येत्या काळात ही आवक वाढत जाईल, असेही बाजार समितीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान नाशकातही चिंचेची आवक कमी असल्याने येथे चिंचेला २१०० ते कमाल २५०० असा प्रतिक्किंटल दर मिळत आहे. तर सरासरी २३८० रुपये दर मिळत आहे. चालू महिन्यात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत न फोडलेल्या चिंचेची आवक ५ क्किंटल आवक झाली. त्यास किमान २२०० ते कमाल २५०० दर राहिला. तर २३८० रुपये प्रतिक्किंटल सरासरी दर मिळाला.

 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक सध्या घटली असून अवघी ५ ते १०० किलो आवक होत आहे. त्यामुळे आवक नसल्याने सध्या चिंचेचे लिलाव होत नसल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले.नांदेडमध्ये चिंचेला ८ हजार ते ८५०० रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापारी इमरान बागवान यांनी दिली.

English Summary: Tamarind prices increased in state agriculture producer market
Published on: 22 February 2021, 03:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)