News

राज्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असताना शेत जमिनीमध्ये पाणी आल्याने शेतातील माती देखील वाहून गेल्याचे दिसून आले. असे असताना आता या कामासाठी संपूर्ण तालुका एक झाला असून शेतकऱ्यांची ही कामे आता याद्वारे करून दिली जाणार आहेत.

Updated on 02 February, 2022 10:42 AM IST

राज्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असताना शेत जमिनीमध्ये पाणी आल्याने शेतातील माती देखील वाहून गेल्याचे दिसून आले. असे असताना आता या कामासाठी संपूर्ण तालुका एक झाला असून शेतकऱ्यांची ही कामे आता याद्वारे करून दिली जाणार आहेत. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या ८१ गावातील शेतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी मोठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. पुढील काही दिवस हे काम सुरु राहणार आहे.

या कामासाठी ७५ जेसीबी, ८ पोकलेन, ४ डंपर आणि ३ ट्रॅक्टर, दाखल झाले आहेत, आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून खंडाळा तालुका जेसीबी असोसिएशन आणि सातारा प्रशासन यांच्या संयुक्त मदतीतून हे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये गावा गावात जाऊन नुकसान झालेल्या शेतीच्या पुनर्बांधणीचे काम केले जाणार आहे. ही संपूर्ण यंत्रणा महाबळेश्वर तालुक्यातील ८१ गावात पोहचली आहे. मकरंद पाटील यांनी या पुनर्बांधणी कामासाठी सर्व यंत्रणा मोफत मिळवली आहे.

यासाठीच्या इंधनाचा खर्च जिल्हा नियोजन मंडळातून करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हे काम मोफत केले जाणार आहे. जुन जुलै महिन्यात या भागात भात लागवडीसाठी लगबग सुरू होते आणि या शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात भात शेती करता यावी यासाठी त्यांना शेत तयार करुन देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे, महाबळेश्वर तालुक्यात ८१ गावात झालेल्या शेतीचे नुकसान व पुनर्बांधणी यासाठी आमदार मकरंद पाटील सातत्याने प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी तालुक्यातील जेसीबी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली, आणि त्यांनी देखील याला प्रतिसाद देत कामाला होकार दिला आहे.

दरम्यान, याठिकाणी जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने असंख्य गावांना मोठा फटका बसला. यामध्ये तब्बल १५८० हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले होते. सरकारकडून अजूनही कोणतीही मदत त्यांना मिळाली नाही. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील ८३ गावातील शेतीचे मोठे नुकसान पावसाने झाले होते. येथील शेती पूर्णतः वाहून गेली आहे, तर अनेक गावातील शेती नापीक होण्याची भीती होती. अखेर आता सगळ्या शेतकऱ्यांची ही कामे होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

English Summary: Taluka came together for farmers! 75 JCB 8 Poklen 4 dumpers and 3 tractors will be of great benefit to the farmers
Published on: 02 February 2022, 10:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)