News

हळदीला दैनंदिन जीवनात तसेच आहारात आणि आयुर्वेदात खूप मोठे महत्वाचे स्थान आहे. हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो वेगवेगळ्या ठिकाणी हळदीचा वापर केला जातो. हळदीला बाजारात प्रचंड मागणी असली तरी हळदीच्या भावात मोठी गफलत होताना दिसून येत आहे.

Updated on 04 September, 2022 11:52 AM IST

हळदीला दैनंदिन जीवनात तसेच आहारात आणि आयुर्वेदात खूप मोठे महत्वाचे स्थान आहे. हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो वेगवेगळ्या ठिकाणी हळदीचा वापर केला जातो. हळदीला बाजारात प्रचंड मागणी असली तरी हळदीच्या भावात मोठी गफलत होताना दिसून येत आहे.

कृत्रिम रित्या हळदीचे भाव पाडण्याचे षडयंत्र:-

शेतकरी वर्गाच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या वायदे बाजारात शेतकऱ्यांच्या नावाखाली काही लोकच फायदा घेत आहेत. हे लोक हळदीची प्रत्यक्ष खरेदी आणि विक्री न करता केवळ सौदे करून हळदीच्या भावात कुत्रिम प्रकारे तेजी आणि मंदी आणून हळदीचे भाव पाडण्याचे षडयंत्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून रचत आहे.

 

हेही वाचा:-आवक घटल्यामुळे ड्रॅगन फ्रुटच्या दरात मोठी सुधारणा

मराठवाड्यातील हळद ही एनसीडीईएक्स’च्या निषकात बसत नसल्यामुळे एनसीडीईएक्स येथील हळद खरेदी करत नाही. परंतु शेतकरी वर्गाच्या नावाखाली निव्वळ मोकळे सौदे करून काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. हे लोक कृत्रिम रित्या हळदीचे भाव पाडून स्वतः चा फायदा करत आहेत. या वर तोडगा काढ्यासाठी सर्व हळद व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपन्या, अडते यांची बैठक नांदेड येथे शुक्रवारी रोजी झाली. मागणीसाठी वेळप्रसंगी मराठवाड्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यातून हे प्रकरण थांबून शेतकरी वर्गाचा फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा:-७ सप्टेंबरपर्यंत शेवटची तारीख शेतकऱ्यांनी आधारशी ई-केवायसी करा; अन्यथा PM किसान चे पुढील हप्ते मिळणार नाहीत.

 

आंदोलन करून बाजारपेठा बंद करण्याचा इशारा:-

आपल्या एकूण संपूर्ण देशातील हळदीच्या उत्पादनापैकी ५० टक्के हळदीचे उत्पादन हे मराठवाडा, विदर्भात होते. त्यामुळे ‘सेन्सेक्स’ने आपले निकष बदलून विदर्भ मराठवाड्यातील हळद केंद्रस्थानी ठेवून निकष करावेत, शिवाय या मुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होइल, अशीही मागणी ही या बैठकीत करण्यात आली. जर का मागण्या मान्य नाही केल्या तर बाजारपेठा बंद ठेऊन मोठे आंदोलन करू असा इशारा ही दिला आहे.


या बैठकीत अनेक बड्या व्यक्तींचा समावेश होता शिवाय शेतकरी वर्ग, व्यापारी वर्गाला सुद्धा या बैठकीत सामील केले होते. या बैठकीमध्ये ज्ञानेश्वर मामडे, हर्ष मालू, शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले, गोदा फार्मचे नितीन चव्हाण, आनंद मंत्री, संदीप बाहेती, स्वप्नील मुरक्या, जुगल बाहेती, श्याम मुरक्या, मनोज लड्डा, सुनील लड्डा, जयप्रकाश लड्गो, गोपाल धूत, प्रवीण कासलीवाल, प्रल्हाद काकांडीकर, बालाजी लड्डा, अक्षय गोयंका, सत्तू भराडिया, आशिष रांका, सुनील काबरा, संजय बाहेती, आलोक जाधव, आनंद धूत, दीपक म्होरक्या, रवी नागठाणे, राहुल नागठाणे यांची उपसथिती होती.

English Summary: Take turmeric out of NCDEX futures market, or else strike and close the markets.
Published on: 04 September 2022, 11:52 IST