News

देशात सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांसाठी विदेशी गुंतवणूक न घेता त्यापेक्षा देशातील सामान्य माणसाकडून एक लाख रुपये वार्षिक आठ टक्के व्याजाने घेऊ, असे केंद्रीय परिवहन मंत्री तीन गडकरी यांनी म्हटले आहे.

Updated on 06 February, 2022 12:57 PM IST

देशात सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांसाठी विदेशी गुंतवणूक न घेता त्यापेक्षा देशातील सामान्य माणसाकडून एक लाख रुपये वार्षिक आठ टक्के व्याजाने घेऊ, असे केंद्रीय परिवहन मंत्री तीन गडकरी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यापेक्षा शेतकरी, शेतमजूर, पोलीस कॉन्स्टेबल, क्लार्क आणि सरकारचे कर्मचारी त्यांच्याकडून पैसे गोळा करून प्रकल्प पूर्ण करू! पुढे बोलताना ते म्हणाले की, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बेस्ट साठी इलेक्ट्रिक बस घेतल्या.

 तीन वर्षांपूर्वी मी ही प्रयत्न केले होते. परंतु आता त्या आदित्य ठाकरे यांनी घेतल्या अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. इलेक्ट्रिक बसला एका किलोमीटर ला पन्नास रुपये खर्च येतो तर डिझेल बसला एका किलोमीटर साठी एकशे दहा रुपये खर्च येतो. 

सोबतच मुंबईत लवकरच वॉटर  टॅक्सी सुरू होत आहे याचा धागा पकडत नितीन गडकरी म्हणाले की, दक्षिण मुंबईतून अवघ्या 13 मिनिटात या वॉटर टॅक्सी नवी मुंबईत विमानतळ परिसरात जातील. तसेच देशात वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा विचार देखील आहे असे ते म्हणाले.

English Summary: take loan from commom man for complete fundamental project says nitin gadkari
Published on: 06 February 2022, 12:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)