आपण दररोज कुठले ना कुठले वाहन चालवीत असतो. कामावर जाण्यासाठी, शेतात जाण्यासाठी तसेच इतर सर्व महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला कुठे प्रवास करायचा असेल तर आपण वाहन घेऊनच प्रवास करत असतो. वाहनामुळे 'घंटो का काम मिनिटो में' झाले आहे. मात्र असे असले तरी वाहन चालविणे मोठ्या जोखमीचे कार्य आहे. यामुळे अनेकदा आपल्यावर संकट ओढवले जाते तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी देखील यामुळे संकट निर्माण होते.
म्हणूनच, भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशातील सर्व वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची सूचना दिली आहे तसेच केंद्रीय सडक व परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी वाहनचालकांना एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे. केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी कोणता महत्त्वाचा सल्ला वाहनचालकांना दिला आहे याविषयी आपण जाणून घेऊया.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देशातील जनतेला कल्पना व्हावी म्हणुन 2020 मध्ये किती अपघात झालेत याची विस्तृत माहिती दिली आहे. गडकरींच्या मध्ये 2020 मध्ये ड्रिंक अँड ड्राइव्ह म्हणजे मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे जवळपास आठ हजार 355 लोकांचे अपघात झाले आहेत. विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यामुळे देशभरातून 20228 लोकांचे दुर्दैवी अपघात झाले आहेत. देशात 2020 या साली जवळपास तीन लाख 66 हजार 128 अपघात झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना ही महत्वपूर्ण माहिती भारतीय जनतेला कळवली आहे. सिग्नल तोडल्यामुळे संपूर्ण देशभरातून जवळपास 2721 अपघात झाले आहेत. तर कॉल ऑन ड्राईव्ह म्हणजेच वाहन चालविताना फोनवर बोलल्यामुळे 62 हजार 738 देशभरात अपघात झाले आहेत. 2020 या वर्षी 48 हजार 144 लोकांकडून मद्यपान करून गाडी चालवल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे. तसेच 2021 मध्ये हा आकडा वाढला असून जवळपास 56 हजार 204 लोकांकडून मद्यपान करून वाहन चालवण्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या मते, 2021 मध्येदेशातील सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाणारे उत्तर प्रदेश राज्यातून वाहन चालवताना नियमांची पायमल्ली केली गेल्यामुळे अशा जनतेकडून 447 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. नितीन गडकरी यांनी सांगितले की, शासनाने नियमांचे कडक अंमलबजावणी केली असल्याने एवढा मोठा निधी दंड स्वरूपात आकारण्यात आला आहे. तसेच गडकरी यांना आशा आहे की, शासनाच्या या कडक धोरणामुळे जनतेला वचक बसेल आणि अपघाताच्या घटना कमी होतील. भाजपाशासित हरियाणा राज्यातून 356 कोटी एवढी मोठी रक्कम दंड स्वरूप आकारली गेली आहे, तसेच काँग्रेसशासित राजस्थानमधून देखील 265 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच अजून एक भाजपाशासित राज्यातून म्हणजेच बिहार मधून 258 कोटी रुपयांचा दंड जनतेकडून वसूल करण्यात आला आहे.
गडकरी यांनी सांगितले की, वर्ष 2020 मध्ये टोलवसुलीतुन 27 हजार 744 कोटी रुपये सरकारने जमा केले आहेत, तसेच 2021 मध्ये 24 हजार 989 कोटी रुपये टोलवसुलीतुन सरकारने वसूल केले आहेत. तसेच मागील दोन वर्षात घडलेल्या दुर्दैवी अपघाताबाबत गडकरी यांनी चिंता व्यक्त केली असून. देशातील तमाम जनतेलावाहन चालवताना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वाहन सावधानतेने चालवण्याचा हा गडकरींचा मंत्र देशातील जनता काटेकोरपणे अमलात आणण्याचा प्रयत्न करेन एवढीच आशा आहे.
Published on: 03 February 2022, 11:13 IST