News

शेतकरी आपल्या शेतात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या सर्व ऋतू मध्ये काम करतो. त्यामुळं रानात काम करताना अनेक नैसर्गिक आपत्ती येण्याची जास्त भीती शेतकऱ्याला असते.दरवर्षी पाऊस पडतो, कधी गारांचा पाऊस कधी वादळी वारे, मुसळधार पाऊस यांत सुद्धा शेतकरी रानात काम करत असतो. शेतकऱ्याला सर्वात मोठी भीती ही पावसाळा ऋतूमध्ये असते. कारण आपण बऱ्याच ठिकाणी ऐकले असेल की वीज अंगावर पडून शेतकरी ठार.

Updated on 14 October, 2021 5:16 PM IST

शेतकरी आपल्या शेतात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या सर्व ऋतू मध्ये काम करतो. त्यामुळं रानात काम करताना अनेक नैसर्गिक आपत्ती येण्याची जास्त भीती शेतकऱ्याला(farmer) असते.दरवर्षी पाऊस पडतो, कधी गारांचा पाऊस कधी वादळी वारे, मुसळधार पाऊस यांत सुद्धा शेतकरी रानात काम करत असतो. शेतकऱ्याला सर्वात मोठी भीती ही पावसाळा ऋतूमध्ये असते. कारण आपण बऱ्याच ठिकाणी ऐकले असेल की वीज अंगावर पडून शेतकरी ठार.

पावसात वृक्षाखाली थांबण धोक्याच:

यंदाच्या वर्षी सुद्धा राज्यात जोरदार पाऊस झाला त्यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सुद्धा झाले. कित्येक पिके वाहून गेली. वीज पडल्यामुळे  शेतकऱ्यांचे  सुद्धा   नुकसान  होते. जनावरे मरतात अशी अनेक कारणे आहेत. शेतात  काम  करताना विजेपासून आपला जीव वाचवायचा असेल तर या गोष्टी तुम्ही करायलाच हव्या.रानात(farm) असताना   विजांचा  कडकडाटला सुरवात झाल्यास सर्वात आधी सुरक्षित अश्या जागी जाऊन थांबा. बरेच लोक एखाद्या मोठ्या वृक्षाखाली जाऊन थांबतात परंतु हे खूप धोकादायक आहे. कारण वीज ही झाडांतूनच  प्रवाहीत होण्याची दाट शक्यता असते. याचबरोबर उंच ठिकाणी असलेले डोंगर किंवा टेकड्या या ठिकाणी जाण्यास टाळावे.अश्या वेळेत तुम्ही जमिनीच्या जवळ जेवढे जाल  तेवढे  सुरक्षित  तुम्ही राहणार आहात. जर का काही कारणामुळे सुरक्षित ठिकाणी जाऊ न शकल्यास लगेच दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन खाली बसा व कानावर हात ठेवा.

जर का तुम्हाला वीज विजेचा कडकडाट सुरू असताना तुमच्या अंगावर जर का विद्युत प्रवाह संचारत असल्याचे जाणवल्यास अंगावरील सर्व केस हे उभे राहितात किंवा त्वचेवरील केस उभे राहिल्यास वीज कोसळण्याची खूप मोठी शक्यता असते. त्या साठी अशे जाणवल्यास लगेच जमिनीवर पालथे झोपावे किंवा गुडघ्यावर बसून डोके खाली घालावे.बरेच  शेतकरी  पावसापासून वाचण्यासाठी छत्रीचा वापर करतात परंतु त्यामध्ये लोखंड किंवा असल्यामुळे वीज पडण्याचा धोका सुद्धा2 जास्त असतो. आणि हातात सुद्धा कोणत्या प्रकारच्या धातूची वस्तू धरणे  टाळावे.

अश्या प्रकारे घ्या काळजी:-

वीज ही सर्वात जास्त विद्युत खांबाला आकर्षित करत असते. त्यामुळे पावसाळ्यात विजेच्या खांबाखाली थांबण्याची चूक अजिबात करु नका. तसेच शेतीमधील धरणे किंवा शेतालगत असलेल्या तालावपासून सुद्धा लांब राहावे. जेव्हा वीजेचा कडकडाट सुरु असतो तेव्हा मोबाईलचा वापर टाळावा.

प्राथमिक उपचार:-

वीज कोसळलेल्या व्यक्ती ला लगेच हात लावू नका. अशी लोकांची एक प्रकरण समजुत आहे परंतु वास्तविक असे काही नाही. सर्वात प्रथम बाधित व्यक्तीचा श्वास चालू आहे का ते पहा. जर का श्वास बंद असेल तर नाकावाटे आणि तोंडावाटे त्याला ऑक्सिजन ची गरज आहे.

English Summary: Take care in rainy season, important news for every farmer
Published on: 14 October 2021, 05:16 IST