सिंधुदुर्ग: शिरोडा परिसरात खाडीतील मस्त्यसंवर्धनास मोठ्या प्रमाणात वाव आहे. या दृष्टीकोनातून या परिसरातील राहीवाशांनी केज फिशिंग, मड क्रॅब फार्मिंग या योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भाटीमळी शिरोडा ता. वेंगुर्ले येथे बोलताना केले.
भाटीमळी खार भूमि योजना व शिरोडा खार भूमि योजना अनुक्रमे 75.46 लक्ष रुपये व 1 कोटी 24 लक्ष रुपये खर्चाच्या योजनांचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, राजन गावडे, दिलीप गावडे, कार्यकारी अभियंता डी.डी. शिंदे, उपअभियंता आर.आर. पाटील आदी उपस्थित होते.
भाटीमळी खारभूमी योजना सुमारे 41 वर्षे जुनी होती. रेडी सारख्या मोठ्या खाडीस ही समांतर असल्याने सततचे नैसर्गिक उधान, पूर यामुळे योजनेच्या बांधाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ही योजना नादुरुस्त असल्याने शेतीत खारे पाणी शिरुन मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असे. आता योजनेतील उघाडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याच बरोबर या परिसरातील शिरोडा खारभूमी योजनेतील उघाडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. शिरोडा ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 70 हेक्टर क्षेत्र यामुळे पुन:र्स्थापित होणार आहे.
Published on: 25 December 2018, 08:43 IST