News

तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा स्थापनेचा अध्यादेश मा. राज्यपाल, महाराष्ट्र यांनी 4 डिसेंबर 1997 रोजी प्रस्थापित केला होता. त्यानंतर तापी विकास पाटबंधारे महामंडळाचे मुख्य कार्यालयाचे कामकाज हे 1 जानेवारी 1998 रोजी सुरू करण्यात आले.

Updated on 20 March, 2022 12:21 PM IST

 तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा स्थापनेचा अध्यादेश मा. राज्यपाल, महाराष्ट्र यांनी 4 डिसेंबर 1997 रोजी प्रस्थापित केला होता. त्यानंतर तापी विकास पाटबंधारे महामंडळाचे मुख्य कार्यालयाचे कामकाज हे 1 जानेवारी 1998 रोजी सुरू करण्यात आले.

तापी पाटबंधारे विकास महामंडळ हे एक शासन अंगीकृत महामंडळ असून त्याचा एक सामाईक शिक्का आहे. या लेखामध्ये आपण तापी पाटबंधारे विकास महामंडळाची माहिती जाणून घेणार आहोत.

नक्की वाचा:ग्रेटा ग्लाईडला करा अडीच तास चार्ज देईल 100 किमीची रेंज, लॉन्च झाली ही अप्रतिम इलेक्ट्रिक स्कूटर

तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना

 तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना ही 4 डिसेंबर 1997 रोजी करण्यात आली व या महामंडळाचे प्रत्यक्ष कामकाजाची सुरुवात ही एक जानेवारी 1998 पासून सुरू झाली. तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय हे जळगाव या शहरात असून या महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो तर नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांचा तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेला आहे.

 तापी पाटबंधारे विकास महामंडळ स्थापन करण्यामागचा प्रमुख उद्देश….

 तापी पाटबंधारे विकास महामंडळ या नावांमध्ये तापी नदीचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे यावरून समजते की तापी नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे काम हे महामंडळाकडे आहे. आपल्याला माहित आहेच की तापी ही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी असून  या नदीची लांबी 724 किलोमीटर आहे. या 724 किलोमीटर मधून  140 किलोमीटर जळगाव जिल्ह्यातून व 88नक्की वाचा:शेतकरी पुत्राची कमाल! नाही गरज पेट्रोल आणि चार्जिंगची, तरीही गाडी धावेल सुसाट वेगाने

 किलोमीटर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नदी आहे. जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये या नदीवर हतनुर धरण वगळता दुसऱ्या कुठलेही धरण नाही. गुजरात मध्ये उकाई या ठिकाणी या नदीवर मोठे धरण आहे. जर पावसाळ्याचा विचार केला तर जवळ जवळ तापी नदीतून प्रतिवर्षी तीनशे ते साडेतीनशे अब्ज घनफूट पाणी वाहून जाते. परंतु तरीदेखील महाराष्ट्राला या नदीच्या पाण्याचा हवा तेवढा फायदा होत नाही. यामध्ये गमतीचा भाग म्हणजे महाराष्ट्रातील याच तापी खोऱ्यात असलेले 15 तालुके दुष्काळग्रस्त आहेत. त्यामुळे या नदीच्या पाण्याची जी विषम परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी व सिंचनाचा अनुशेष भरुन निघावा यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यातआली. 

आतापर्यंत तापी पाटबंधारे विकास महामंडळ चा विचार केला तर या मंडळाकडून आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या जवळजवळ 326 अब्ज घनफूट पाण्याचे व्यवस्थित नियोजन केलेले आहे परंतु त्यापैकी उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला जे 233.13 अब्ज घनफूट पाणी येते त्या पाण्याचे नियोजन महामंडळाकडून आता होणार आहे.

English Summary: taapi patbandhare vikas mahamandal is crucial for water planning fot tapti river
Published on: 20 March 2022, 12:21 IST