गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसत आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली जात आहे. यावर बोलताना गरिबांनी जगायचं कसं? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. शुक्रवारी पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना, रशिया आणि यूक्रेनच्या युद्धामुळे जगभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ही वाढतील असा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला होता.
यावर लोकसभेत भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी सुप्रिया सुळेंनी रशिया-युक्रेनमधील युद्धाचाही परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असून देशातील जनतेलाही त्याचा फटका बसत आहेत. सध्या महागाई प्रचंड वाढली असून ही महागाई कमी करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सध्या गोडतेल 67 टक्क्यांनी, पामतेल 61 टक्क्यांनी वाढले आहे, मूगडाळ 45, उडीदाची डाळ 54 आणि तूर डाळ 49 टक्क्यांनी महाग झाली आहे. आता, देशातील गरिबांनी जगायचे कसे? असा प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. तसेच देशातील बहुतांश राज्य आर्थिक बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत. असे असताना त्यांना जीएसटीचा पैसाही राज्यांना वेळेवर उपलब्ध होत नाही. यामुळे राज्यांना आर्थिक चणचण भासत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारला मदत करा, देशातील वाढलेली महागाई कमी करा, वस्तूंच्या किंमती कमी करा. सध्या यूक्रेन आणि रशियामध्ये वाद निर्माण झाल्यामुळे इंधनच्या किंमती गगनात भिडल्या आहेत. याचा तोडा सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. यामुळे देशातील अनेक गोष्टींवर याचा परिणाम होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात यामधून दिलासा मिळणार का हे लवकरच समजेल.
महत्वाच्या बातम्या:
49 साखर कारखाने हे कायद्याचा भंग करुन खरेदी, आता कारखाने विक्री घोटाळा येणार बाहेर?
42 वर्षांच्या संघर्षाला यश शेती पाण्याचा प्रश्न मिटला, शेतकऱ्यांचा आनंद गगनाला..
Published on: 15 March 2022, 02:12 IST