चिखली- जिल्ह्यात २८डीसेंबर तो झालेल्या वादळीवारे,गारपीट,पावसाचा फटका चिखली तालुक्यातही अनेक शिवारामध्ये बसला असुन,वैरागड,उंद्री परीसरामध्ये नुकसान झालेल्या कांदा,तुर,हरभरा,गहु या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी दि२९डीसेंबर रोजी सकाळीच स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी तलाठी,कृषी सहाय्यक व संबंधीत विभागाच्या अधिकार्यान समवेत केली आहे.
दि२८डीसेंबर रोजी हवामान खात्याने सांगीतल्या प्रमाणे बुलढाणा जिल्ह्यात तुफान गारपीट,आणि वादळी पाऊस पडला.या अचानक झालेल्या नैसर्गीक संकटाचा फटका चिखली तालुक्यातही ठिकठीकाणी बसला आहे.तर हाता तोंडाशी आलेले तुर,हरभरा,हिवाळी सोयाबीन,कांदा,गहु,व अनेक भागामधे मक्का पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अगोदरच अतिवृष्टि व नापिकेने त्रस्त शेतकर्याना शासनाकडुन तुटपुंजी मदत मिळाल्याने अन्याय झाला असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.तर आता या पुन्हा आलेल्या नैसर्गीक संकटामुळे शेतकर्याना भारीव मदत मिळेल
अशी अपेक्षा शेतकर्याकडुन होतांना दिसत आहे.या झालेल्या नुकसान ग्रस्त वैरागड,उंद्री शिवारातील पिकाची पाहणी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी शेतकर्यासमवेत केली असुन तातडीने पिक पंचनामे करुन सरसगट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यासह सरनाईक यांनी केली आहे.यावेळी माजी सरपंच तथा भाजपा नेते अमोल साठे,दिपक तायडे, कृषी सहाय्यक श्री विनकर,तलाठी सय्यद साहेब,सरपंच गजानन बनकर,संतोष वांगडे,गोपाल तावरे,
विठ्ठल साजरे नितीन कड,भगवा नितावे,सतीश गुंड,देवानंद चौरे,यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 31 December 2021, 02:10 IST