एफ आर पी चा दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता लवकर मिळावा त्यासोबतच वीजजोडणी तोडण्याची कारवाई त्वरित थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी हे दिनांक 14 फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ने धडक देणार आहेत.
14 फेब्रुवारी या दिवशी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे देखील माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
राजू शेट्टी यांनी मांडलेले मुद्दे
जे शेतकरी नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याच्या निर्णयाची सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी. त्यासोबतच या रकमेमधून वीज बिलाची रक्कम वजा करून उरलेली रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली.एफआरपीत वाढ झाली असली तरी खत, इंधनाची दरवाढ आणि उत्पादन खर्च पाहता गेल्या तीन वर्षात इतकीच एफ आर पी सध्या मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचण होत आहे
त्यामुळे 200 रुपयांचा दुसरा हप्ता लवकर मिळावा. कोल्हापूर जिल्ह्यातील वीज बिल वसुली चांगली आणि वीजगळती, वीज चोरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे.तरीही थकबाकीचा मुद्दा पुढे करून येथील शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्याची कारवाई महावितरण करत आहे. ते थांबवण्यात यावे तसेच वीज दोन तास वाढवून द्यावी व वीज दर कमी करावा. भूमि अधिग्रहण कायद्यातील नव्या दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला 70 टक्क्यांनी कमी होणार आहे.
अन्यायकारक असून पूर्वी प्रमाणे मोबदला मिळावा. त्यासोबतच महापुरा मध्ये बुडालेला ऊस तोडण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांना तोडणीच्या सूचना द्यावी यासाठी जिल्हाधिकार्यांना भेटणार असल्याचे देखील माजी खासदार राजूशेट्टी यांनी सांगितले.
Published on: 28 January 2022, 06:14 IST