News

कोरोना कालावधीत लॉकडाऊन लावल्यामुळे सगळे उद्योग धंदे ठप्प झाले होते. या पार्श्वभूमीवर देशातील उद्योगधंद्यांना आधार मिळावा यासाठी व्याजमाफ सवलतीची घोषणा करण्यात आली होती. या सवलती मध्ये सहकारी बँकांचा समावेश करण्यात न आल्याने अनेक उद्योजक या सवलतींपासून वंचित राहिले त्यामुळे त्यांना विशेष पॅकेज देऊन व्याज सवलत मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन केली.

Updated on 22 July, 2022 9:23 AM IST

कोरोना कालावधीत लॉकडाऊन लावल्यामुळे सगळे उद्योग धंदे ठप्प झाले होते. या पार्श्‍वभूमीवर देशातील उद्योगधंद्यांना आधार मिळावा यासाठी व्याजमाफ सवलतीची घोषणा करण्यात आली होती. या सवलती मध्ये सहकारी बँकांचा समावेश करण्यात न आल्याने अनेक उद्योजक या सवलतींपासून वंचित राहिले त्यामुळे त्यांना विशेष पॅकेज देऊन व्याज सवलत मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन केली.

सहकारी बँक यांचा समावेश का महत्त्वाचा?

 बऱ्याच तरुणांनी महाराष्ट्र मध्ये छोटे मोठे उद्योग उभे केले आहेत.

नक्की वाचा:शेतकऱ्यांना नुकसानभरपाई! 'या' 10 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना 33 कोटींचा निधी वितरित, वाचा कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

 परंतु आर्थिक पत नसल्याचे कारण देत राष्ट्रीयकृत बँकांकडून अर्थसहाय्य न मिळाल्यामुळे राज्यात सहकारी बँकांनी कर्ज पुरवठा करून सहाय्य केले आहे. जे उद्योजक लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये प्रकल्प उभे करत होते अशा प्रकल्पांची किंमत सिमेंटचे दर,

वाढलेले स्टीलचे दर इत्यादी कारणांमुळे  वाढली. बऱ्याच उद्योजकांनी  सहकारी बँकांकडून आर्थिक सहाय्य घेतल्यामुळे केंद्र सरकारच्या अनुदान अथवा व्याज सवलतीच्या योजनांचा अशा तरुणांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या व्याजसवलत माफीमध्ये सहकारी बँक यांचा समावेश करावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

 वाचा:अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निधी वितरीत, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

यामध्ये काही सहकारी बँकांनी व्याजावरील व्याजाची रक्कम माफ केली आहे परंतु केंद्र सरकारकडून सहकारी बँकांना संबंधित रक्कम न मिळाल्यामुळे उद्योजकांवर व्याज सवलतीची टांगती तलवार उभी आहे. त्यामुळे केंद्र सरकार कडून विशेष बाब म्हणून लॉकडाउनच्या काळातील  व्याज सवलत तिचे विशेष पॅकेज देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

या सगळ्या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी दिल्लीत नारायण राणे यांची भेट घेऊन संबंधित मागणी केली आहे. यावर नारायण राणे येणाऱ्या काळात काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नक्की वाचा:'AJAI' कृषी पत्रकारितेतील ऐतिहासिक क्षण: केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला!

English Summary: swabhimani shetkari sanghtana chief raju shetty do demand at msme minister narayan rane
Published on: 22 July 2022, 09:23 IST