News

राज्यात कालापासून दूध दरवाढीवरुन राजकारण तापले आहे. दरवाढीसाठी आंदोलन चालू असून काल शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी आंदोलन केले. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगली जिल्ह्यात दूध दर वाढीविषयी आंदोलन करण्यात आले.

Updated on 21 July, 2020 2:10 PM IST


राज्यात कालापासून दूध दरवाढीवरुन राजकारण तापले आहे. दरवाढीसाठी चालू असून काल शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी आंदोलन केले होते. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली केले. पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला. हा टँकर गोकुळ दूध संघाचा असून 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता.

स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दुग्ध विभागाने गोकुळ दूध संघाला नोटीस पाठवली होती. या नोटीसनंतर गोकुळ दूध संघाने स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला दिलेला पाठिंबा मागे घेत सकाळचे दूध संकलन आणि दूध वाहतूक सुरु ठेवली होती. त्यानंतर स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी नेमके गोकुळच्या टँकरला लक्ष्य केले आहे.

 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले  आहे. या आंदोलनाची सुरुवात सांगली जिल्ह्यात आक्रमक पद्धतीने झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरु हायवेवर येलूर फाटा इथे आंदोलन करण्यात आले. सकाळी सहाच्या सुमारास दूध टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचा हा टँकर मुंबईकडे निघाला असता, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने हा टँकर अडवला. यानंतर टँकरचे सील तोडून दूध रस्त्यावर सोडलं आणि जोरदार घोषणाबाजी केली.

English Summary: swabhimani party agitation for milk price rate , broke milk tanker on highway
Published on: 21 July 2020, 02:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)