News

सोनेवाडी येथील गट नं. 10,11 मधील पाझर तलावा मधील भिंती शेजारी बेकायदेशीर पणे

Updated on 14 September, 2022 9:40 PM IST

सोनेवाडी येथील गट नं. 10,11 मधील पाझर तलावा मधील भिंती शेजारी बेकायदेशीर पणे खोदलेता खड्डा बुजविण्याच्या तसेच साडव्यात गेलेल्या सोनेवाडी ते पांग्री जाणारा रस्ता खुला करुन देण्यात यावा या मागणीसाठी सोनेवाडी येथील शेतकरी यांनी पाझर तलावामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.यासंदर्भात असे की , मौजे सोनेवाडी येथील गट नंबर 10 व 11 मधील झालेल्या पाझर तलावामध्ये

बेकायदेशीर अतिक्रमण करून खोदलेल्या खड्ड्यामुळे पाझर तलावाच्या भिंतीला तडा जाऊन The hole dug by illegal encroachment caused the wall of the seepage lake to crack तलाव फुटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याबाबत  अनेकवेळा  लेखी विनंती अर्ज देऊन सुद्धा

हे ही वाचा - कापूस पिकातील लाल्या व बोंड सड जाणून घ्या ओळख आणि व्यवस्थापन

आज पर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही त्यामुळे गट नंबर १० व ११ मधील सर्व शेतकरी व धरणाखालील जमीन गेलेले सर्व शेतकरी यांनी सदर तलावामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नितीन

राजपूत, सुधाकर तायडे यांचे नेतृत्वात १4 सप्टेंबर २०२२ रोजी पासून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. तसेच सदर पाझर तलावमध्ये सांडयामध्ये गेलेला सोनेवाडी ते पांग्री जाणारा पांधण रस्ता हा पूर्ववत करून देण्यात यावा.अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये नितीन राजपुत, सुधाकर तायडे (स्वाभिमानी शेतकरी संघटना), प्रकाश तायडे , सुधाकर शेळके, बबन

काळे, सतिश काळे, शंकर काळे, भास्कर काळे, अशोक काळे, महादु गुंजकर, भगवत गुंजकर , जयश्री प्रकाश तायडे, कुशिवर्ताबाई शेळके, सविता बबन काळे, .सुरेखा सुधाकर तायडे, जनाबाई काळे, मंगला अशोक काळे, मंगलाबाई भास्कर काळे, कमलबाई गुंजकर. भिकाबाई मुनीर शेख , कस्तुराबाई जंजाळ यांच्यासह अनेक शेतकरी भगीनी व बांधव सहभागी झाले आहेत.

English Summary: Swabhimani Jalsamadhi movement with farmer brothers in Pasar Lake to fill that pit
Published on: 14 September 2022, 08:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)